भाजपचे आज शक्तिप्रदर्शन

Mumbai
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नड्डा करणार मार्गदर्शन

लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर आता लवकरच होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून रणशिंग फुंकण्यात आले आहे. आगामी निवडणूक लक्षात घेता शिवसेनेकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीवार्द यात्रा सुरू केलेली असतानाच आता भाजपानेदेखील निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचा हा सामना ३६ विरोधात शून्यने जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे.

या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी भाजपकडून मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. यात भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा सहभागी होणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांना ते नेमके काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून त्यात भाजपादेखील मागे राहिलेला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार? यावरुन सध्या महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
भाजपचे आज मुंबईत शक्तिप्रदर्शन

त्यानंतर आता कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे, यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु करण्यात आले असून त्यासाठी भाजपाकडून रविवारी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. मुंबईत रविवारी भाजप कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रदेश कार्यसमितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी भाजपाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे मुंबईत आगमन झाले आहे. एकीकडे मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेली रस्सीखेच आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम सामना ३६ शून्यने जिंकण्याचा व्यक्त केलेला निर्धार, या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईत भाजप मोठे शक्ती प्रदर्शन करेल, अशी शक्यता आहे.

दरम्यान, जे.पी. नड्डा यांचे शनिवारी मुंबईत आगमन झाले असून त्यांनी छपत्रती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करीत आपल्या दोन दिवसीय दौर्‍याची सुरुवात केली. त्यानंतर रविवारी सकाळी जे.पी.नड्डा हे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यसमितीच्या गोरेगाव येथील बैठकीचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच रावसाहेब पाटील दानवे उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी सकाळी कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे रविवारी 8.30 वाजता चैत्यभूमी, स्वा. सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ येथे भेट देऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर १० वाजता ते बूथ सदस्यता कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांच्या या भरगच्च कार्यक्रमापेक्षा सगळ्यांचे लक्ष हे त्यांच्या भाषणाकडे लागून राहिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here