घरमुंबईरेशनिंग दुकानात अन्नधान्याचा काळाबाजार

रेशनिंग दुकानात अन्नधान्याचा काळाबाजार

Subscribe

रेशनिंग दुकानातील अन्नधान्याची काळाबाजाराने विक्री करून सुमारे सुमारे दोन लाख रूपयांचा अन्नधान्याचा अपहार केल्याप्रकरणी रेशनिंग दुकानदार सुरेश मल्हारी वैद्य आणि महेश चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर परिसरातील रेशनिंग दुकान क्रमांक 38 एफ/152 या दुकानातील शिधा पत्रिकेवर वितरीत करावयाचे तांदूळ, गूळ, तूरडाळ आणि मीठ या अन्नधान्याची नागरिकांना विक्री न करता काळाबाजाराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने अधिकार्‍यांनी दुकानाची तपासणी केली असता रेशनिंगवरील तांदूळ, गूळ, तूरडाळ आणि मीठ या अन्नधान्याची काळाबाजाराने विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याचे आढळून आले.

- Advertisement -

तांदूळ गहू तुरडाळ आणि मीठ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिधा पत्रिकाधारकांची फसवणूक करीत त्यांना हक्कापासून वंचित ठेवल्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कलम फूडग्रेन रेशनिंग ऑर्डर 1966 नुसार महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -