घरमुंबईउधारीच्या पैशावरुन तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार

उधारीच्या पैशावरुन तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार

Subscribe

भायखळा येथील घटना

उधारीच्या पैशांवरुन अब्दुल माजिद साबीर शेख या 25 वर्षांच्या तरुणाच्या गळ्यावर त्याच्याच परिचित तरुणाने ब्लेडने वार केल्याची घटना भायखळा परिसरात घडली. या हल्ल्यात अब्दुल हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. मुद्देसीर सय्यद असे या आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना सोमवारी सकाळी सव्वानऊ वाजता भायखळा येथील संत सावता मार्गावरील नारळवाडी कब्रस्तान कंपाऊंड परिसरात घडली. याच ठिकाणी अब्दुल शेख हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. मुद्देसीर सय्यद हा त्याच्या परिचित असून तो त्याच परिसरात राहतो. काही दिवसांपूर्वी त्याने मुद्देसीरला काही पैसे उधारीने दिले होते. ही रक्कम त्याने परत केली होती, मात्र पैसे परत घेताना तो नशेत होता. तसेच झोपेतून उठून त्याच्याकडून त्याने पैसे घेतल्याने त्याचा त्याच्या मनात राग होता.

- Advertisement -

या रागातून मुद्देसीर हा सोमवारी सकाळी त्याच्या घराजवळ गेला होता. यावेळी उधारीच्या पैशावरुन त्याने अब्दुलशी वाद घालून त्याच्या गळ्यावरच ब्लेडने वार केले होते. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. गळ्याची नस कापली गेल्याने त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मुद्देसीर सय्यद याला अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -