घरमुंबईजमीन खरेदीदारांचा प्रस्तावित शाई, काळू धरणाला विळखा !

जमीन खरेदीदारांचा प्रस्तावित शाई, काळू धरणाला विळखा !

Subscribe

राज्य शासनाकडून अधिकचे सरकारी लाभ उकळणार्‍या जमीन खरेदीदारांचे एक रॅकेट समृद्धी महामार्गानंतर शहापूर आणि मुरबाड या दोन्ही तालुक्यांच्या सीमेवरील प्रस्तावित शाई धरण परिसरातील जमिनी खरेदीसाठी सक्रिय बनले आहे. ऑक्टोबर महिन्यात शाई आणि दुसरे काळूनदी धरण परिसरातील हजारो हेक्टर जमिनींचे खरेदी खत अनुक्रमे शहापूर आणि मुरबाड तालुक्यांतील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदण्यात आले आहे. ठाणे आणि मुंबईतील बढे व्यापारी जमीन खरेदीदार मोठ्या प्रमाणातील शाई आणि काळू धरणालगतच्या जमिनी खरेदी करू लागल्याने त्यांच्या खरेदीला गरजू शेतकरीदेखील बळी पडले आहेत. परंतु, यातील काही जमिनी धरणबाधित तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोडत असल्याने त्याच जमिनी खासगी खरेदीदारांना विकण्यात आल्या आहेत. त्यामुळे जमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेतील शासकीय लाभापासून मूळ शेतकर्‍याला वंचित रहावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

राज्य सरकारची काळू आणि शाई ही दोन धरणं प्रस्तावित करण्यात आली आहेत. परंतु, ही दोन्ही धरणे १२ वर्षांपासून अधिक काळ रखडली असताना सध्याच्या परिस्थितीत ही दोन्ही धरणं वेगाने मार्गी लागण्याच्या हालचाली सुरू झाल्याने जमीन खरेदीदारांनी आपला मोर्चा शाई आणि काळू धरणाच्या परिसरातील जमिनींकडे वळवला आहे.मुरबाड तालुक्यातील काळू धरणासाठी वनखात्याच्या जमिनीव्यतिरिक्त १२ हेक्टर खासगी जमीन खरेदी करावी लागणार आहे. या धरणात ५ गावे पूर्णपणे पाण्याखाली जाणार असून ६ गावांचे अंशतः पुनर्वसन करावे लागणार आहे.

- Advertisement -

काळू धरणाप्रमाणेच मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणामार्फत शासनाने शहापूर तालुक्यातील शाई धरण प्रकल्प हाती घेतला आहे. या धरणासाठी १८ गावांचे पुनर्वसन करणे आवश्यक मानले जात आहे. शाईसाठी ४९४ हेक्टर वनजमीन तसेच २३९७ हेक्टर खासगी जमिनीची आवश्यकता आहे. ठाणे महानगरपालिकेने या धरणासाठी अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मिळते आहे. यामुळेच जमिनी खरेदीचा सपाटा दलालांच्या माध्यमातून येथे सुरू असल्याचे पाहण्यास मिळत आहे. समृद्ध महामार्गालगतदेखील अशाच जागा खरेदी करून त्या जागा नंतर समृद्धी महामार्गासाठी देऊन या जागेचा अधिकचा भाव काही भूमाफियांनी सरकारकडून घेतल्याची उदाहरणे आहेत. त्याच धर्तीवर शाई नदीच्या लगत जमीन दलालांच्या मार्फत शेत जमिनी खरेदी सुरू झाली आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र स्थानिकांच्या कडाडून विरोधामुळे शाई धरण रखडल्याचे सांगण्यात येत आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -