घरमुंबईई-रक्तकोषाबाबत रक्तपेढ्या उदासीन

ई-रक्तकोषाबाबत रक्तपेढ्या उदासीन

Subscribe

राज्य आरोग्य सेवा मंडळ तसंच राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून रक्तपेढ्यांची कानउघडणी

रक्ताची रक्तपेढ्यांमध्ये उपलब्धता, परवान्याची मुदत, रक्त शिबिरे आदींची माहिती राज्याच्या ई-रक्तकोष पोर्टलवर दररोज परवानाधारक रक्तपेढ्यांना पुरवणे बंधनकारक आहे. पण, याबाबत रक्तपेढ्या गंभीर दिसून येत नाहीत. ज्या रक्तपेढ्या ई-रक्तकोष पोर्टलवर माहिती भरणार नाहीत त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल, असा गंभीर इशारा देत रक्तपेढ्यांची कानउघडणी करण्यात आली.

राज्य आरोग्य सेवा मुंबई मंडळ आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून परवानाधारक रक्तपेढ्यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. यात मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील एकूण ३७ रक्तपेढ्यांपैकी २५ रक्तपेढ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – अमिताभ बच्चन यांनी विचारला PUBGचा फुल फॉर्म!

यावेळी ई-कोष पोर्टलवर अद्ययावत आणि रोजची माहिती देणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी ई-पोर्टलवर ऑनलाईन प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले. सिकलसेल, थॅलेसेमिया, हिमोफिलिया या आजारग्रस्त रुग्णांना रक्त पिशवी निःशुल्क द्यावी, स्वेच्छा रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, रक्तदानासाठी कोणतीही लाच देण्यात येऊ नये तसेच बदली रक्तदात्याची मागणीही करू नये, असे सांगण्यात आले.

रक्तसाठ्याची माहिती दररोज भरणे बंधनकारक असेल. पण, यावेळी रक्तपेढ्यांच्या प्रतिनिधींकडून ई-रक्तकोष पोर्टलमध्ये साईनआऊट होताना अडचणी येत असल्याचे सांगितले. याबाबत परिषदेकडून मार्गदर्शन देण्याचे परिषदेच्या अधिकाऱ्यांना सुचित करण्यात आले. रक्तदान करताना एखादा रक्तदाता एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समजून येते. हे संसर्गित रक्त दुसऱ्याला पुरवठा होऊ नये यासाठी स्थानिक आयसीटीसी केंद्राकडे पाठवण्याची सूचनाही करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -