घरमुंबईमहापालिका प्रशासनाला चुक कळली, निधी चौधरी सहआयुक्तच

महापालिका प्रशासनाला चुक कळली, निधी चौधरी सहआयुक्तच

Subscribe

महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर निधी चौधरी यांची दोन महिन्यांपूर्वी पुन्हा शासनात बदली करण्यात आली. त्यानंतर आता महापालिकेने निधी चौधरी या भारतीस प्रशासकीय सेवेतून नियुक्त झाल्याने १८ एप्रिल २०१९ पासून त्यांना उपायुक्त ऐवजी सह आयुक्त असे संबोधण्यात यावे, असा प्रस्ताव सादर केला.

राज्य शासनाने मुंबई महापालिकेत सहआयुक्त म्हणून नियुक्त केलेल्या निधी चौधरी यांच्यावर उपायुक्त (विशेष) पदाचा भार सोपवणार्‍या प्रशासनाने आता आपली चूक मान्य केली. निधी चौधरी या उपायुक्त नव्हे तर सहआयुक्तच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निधी चौधरी महापालिकेतून पुन्हा शासनात गेल्यानंतर प्रशासनाने त्यांना सहआयुक्त पद बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. निधी चौधरी यांनी ज्या कालावधीत उपायुक्त (विशेष) हे पद भुषवले आहे, ते पद सहआयुक्त म्हणून विचारात घेतले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

काय आहे नेमके प्रकरण?

सनदी अधिकारी निधी चौधरी यांची २९ ऑगस्ट २०१७ रोजी महापालिकेत शासनाच्यावतीने सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. महापालिकेत आजवर सहआयुक्त (सुधार) या पदावर सनदी अधिकार्‍यांची नियुक्ती केली जात असताना, महापालिका प्रशासनाने सह आयुक्त हे पद वैध नसल्याचे सांगत तत्कालीन सामान्य प्रशासनाचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी निधी चौधरी यांना उपायुक्त (विशेष) या पदाचा भार सोपवता येईल, असे अभिप्राय दिले. त्यानुसार तत्कालिन आयुक्तांनी निधी चौधरी यांच्यावर उपायुक्त (विशेष) पदाचा भार सोपवला. परंतु महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर निधी चौधरी यांची दोन महिन्यांपूर्वी पुन्हा शासनात बदली करण्यात आली. त्यानंतर आता महापालिकेने निधी चौधरी या भारतीस प्रशासकीय सेवेतून नियुक्त झाल्याने १८ एप्रिल २०१९ पासून त्यांना उपायुक्त ऐवजी सह आयुक्त असे संबोधण्यात यावे, असा प्रस्ताव सादर केला. याबाबत शिवसेनेचे सचिन पडवळ यांनी तीव्र आक्षेप घेत ही चूक कुणाची आहे? कुणाच्या चुकीमुळे सनदी अधिकार्‍यावर उपायुक्तपदाचा भार सोपवण्यात आला? असा सवाल करत याची चौकशी करण्याची मागणी केली. यावर विधी व महसूल समितीच्या अध्यक्ष शीतल म्हात्रे यांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेताच, प्रशासनाच्या वतीने उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांनी आपली चूक झाल्याचे मान्य केले.

- Advertisement -

प्रभात रहांगदळे यांच्या उपायुक्तपदाचा प्रस्ताव घेतला मागे

उपायुक्त (सुधार) या पदावर मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांची नियुक्ती करण्याचा बढतीचा प्रस्ताव विधी समितीला सादर करण्यात आला होता. परंतु यावर शिवसेनेचे सचिन पडवळ यांनी कायदेशीर मुद्दयावर बोट ठेवत, ही पद सनदी अधिकार्‍यांमार्फत भरले जाण्याची तरतूद आहे. मग आपण खात्यांतर्गत कसे काय भरतो असा सवाल केला. यावर उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांनी हा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती प्रशासनाला केली. त्यावर समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी प्रशासनाने प्रस्ताव मागे घेण्याची कारणे स्पष्ट करावी,असे निर्देश दिले. परंतु प्रशासनाचे अधिकारी यावर अनुत्तरीतच राहिले. निधी चौधरी यांच्यावर या पदाचा भार सोपवायला पाहिजे होता. परंतु तीच चुक प्रशासन पुन्हा करत असून सनदी अधिकारी आशुतोष सलील यांच्याकडे प्रशासनाने कायद्यातील तरतुदीनुसार जे पद येते, त्याचाच भार सोपवावा,असेही निर्देश समितीने दिले.


हेही वाचा – निधी चौधरी यांना ‘ते’ ट्विट भोवले; महापालिकेतून मंत्रालयात बदली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -