घरमुंबईपाण्याच्या टाकीत पडून पालिकेच्या एका कामगाराचा मृत्यू, ४ जखमी

पाण्याच्या टाकीत पडून पालिकेच्या एका कामगाराचा मृत्यू, ४ जखमी

Subscribe

हापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा हा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आणणारी दुर्दैवी घटना मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ घडली आहे. इथल्या नाना चौकामध्ये शनिवारी रात्री उशीरा महापालिकेचे काही कामगार पाण्याची टाकीला चावी  देण्याचं काम करत होते. त्यातले ५ कामगार पाण्याच्या टाकीला चावी  देण्याचं काम करत होते. मात्र  तोल गेला आणि ते सर्वजण पाण्याच्या टाकीत पडले.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता…

दरम्यान, लागलीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. १२ वाजून ४० मिनिटांनी या कामगारांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. त्या पाचही जणांना लागलीच नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, त्यातल्या ४५ वर्षीय राकेश निगम या कामगाराचा  दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर इतर ४ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती नायर हॉस्पिटलचे सीएमओ डॉ. अर्सिन यांनी दिली आहे.

- Advertisement -

कशी घडली दुर्घटना?

हे पाचही कामगार भायखळ्याच्या पाणी विभागाच्या मेंटेनन्स विभागाचे होते. पाण्याच्या टाकीची चावी द्यायला हे सगळे गेले होते. ही पाण्याची टाकी जुनी होती. त्यावेळी आधी २ कामगार टाकीत पडले. त्यांना काढायला आणखी २ गेले आणि त्यांना बघायला पाचवा कामगारही आत उतरला. अखेर हे सगळे गुदमरत असल्याचं समजल्यावर अग्निशमन विभागाला बोलावण्यात आलं. त्यातल्या चौघांना जिवंत बाहेर काढण्यात दलाच्या जवानांना यश आलं. पण राकेश निगम यांचा आतमध्येच मृत्यू झाला होता.

इतर जखमींची नावे

उमेश पवार

- Advertisement -

शांताराम भाकटे

सुरेश पवार

बाळासाहेब भावरे

अशी ही पहिलीच घटना…

आजवर मलनि:स्सारण वाहिन्याच्या टाकीत पडून कामगार दुर्घटना घडल्या आहेत. पण पाण्याच्या टाकीत पडून कामगारांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे, असे महापालिकेचे माजी अभियंते आणि विद्यमान काँग्रेस नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -