घरताज्या घडामोडीCoronavirus: करोनाच्या रुग्णांसाठी पालिका हॉस्पिटल रिकामी करण्याचे आदेश

Coronavirus: करोनाच्या रुग्णांसाठी पालिका हॉस्पिटल रिकामी करण्याचे आदेश

Subscribe

पालिकेच्या तिन्ही हॉस्पिटलमधील गर्दी कमी करण्याचे आदेश आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

पालिकेच्या तिन्ही हॉस्पिटलमधील गर्दी आटोक्यात आणि कमी व्हावी शिवाय, करोना रुग्णांसाठी हॉस्पिटल कमी पडू नये यासाठी पालिकेच्या तिन्ही प्रमुख केईएम, नायर आणि सायन हॉस्पिटल रिकामी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आरोग्य सेवेची गरज नसणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन हॉस्पिटल करोना रुग्णांसाठी राखीव करण्याच्या सुचना पालिका आयुक्तांनी सर्व प्रमुख हॉस्पिटलना दिल्या आहेत.

रुग्णांची सतत वाढत जाणारी संख्या पाहता हॉस्पिटल कमी

जगभरात करोना विषाणूमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. देशासह मुंबई आणि महाराष्ट्रातही दररोज करोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रुग्णांची सतत वाढत जाणारी संख्या पाहता हॉस्पिटल कमी पडणार असल्याने पालिकेच्या तिन्ही म्हणजेच केईएम, नायर आणि सायन हॉस्पिटलमधील ज्या रुग्णांना आरोग्य सेवेची गरज नाही त्यांना डिस्चार्ज देऊन हॉस्पिटल रिकामे केले जाणार आहे. करोना रुग्णांसाठी हॉस्पिटल आणि आरोग्य कर्मचारी सज्ज ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

- Advertisement -

कोणत्याही प्रकारचे आजार पसरू नये…

याविषयी पालिका हॉस्पिटलचे प्रमुख आणि संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितलं की, “सर्व गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले जाईल. ज्या वॉर्डमध्ये जेवढे बेड्स आहेत तेवढेच रुग्ण अॅडमिट केले जातील. हॉस्पिटलचा संसर्ग आणि इतर संसर्ग पसरू नये आणि कोणत्याही प्रकारचे आजार पसरू नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे.”

…त्यामुळे बेडसची कमतरता भासण्याची शक्यता

सध्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये १२२ , जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये ५ असे एकूण १२७ रुग्ण भरती आहेत. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आयसोलेशनचे १२७ बेड असून त्यावर सध्या १२२ रुग्ण आहेत. या हॉस्पिटलमध्ये करोनाची लागण झालेले आणि संशयित रुग्ण मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे बेडसची कमतरता भासण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालिकेच्या आणि खासगी हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत.

- Advertisement -

ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही, अशा रुग्णांना घरी पाठवून ते बेड करोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


हेही वाचा – करोनाची लागण झालेल्या डॉक्टरवर उपचार करण्यास रुग्णालयांचा नकार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -