घरमुंबईआयुक्तांनी अधिकाऱ्यांसह पाहिला 'मिशन मंगल'

आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह पाहिला ‘मिशन मंगल’

Subscribe

महापालिकेचे अधिकारी ताणतणावाखाली काम करत असल्याने त्यांचे मनोरंजन करण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्तांनी 'मिशन मंगल' चित्रपटाच्या शो चे विशेष आयोजन केलं होतं.

महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मुंबई महापालिकेतील अधिकारी वर्गासाठी मंगळवारी ‘मिशन मंगल’ या चित्रपटाच्या स्पेशल शोचे आयोजन दादरच्या प्लाझा सिनेमामध्ये केले होते. या मिशन मंगलच्या विशेष शोमध्ये महापालिकेच्या कार्यकारी अभियंता पासून ते थेट आयुक्तांपर्यंतचे सर्व अधिकारी सहभागी झाले होते. महापालिकेचे अधिकारी ताणतणावाखाली काम करत असल्याने त्यांचे मनोरंजन करण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्तांनी या विशेष आयोजन केलं होतं. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोकळेपणाने आणि तणाव विरहित कामकाज करावे हाच या शो मागील उद्देश होता. मात्र अशाप्रकारे अधिकाऱ्यांसाठी चित्रपटाचा शो ठेवून स्वतः त्यांच्यासोबत चित्रपट पहायला जाणे ही मुंबई महापालिकेतील पहिलीच घटना असून प्रवीणसिंह परदेशी हे पहिले आयुक्त ठरले आहेत.

अक्षय कुमारने केले कौतुक

चित्रपट अभिनेते अक्षय कुमार यांचे मिशन मंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला असून दादरच्या प्लाझा सिनेमामध्ये मंगळवारी संध्याकाळी विशेष शोच्या आयोजन मुंबई महापालिकेच्या सर्व अधिकारी वर्गासाठी करण्यात आलं होतं. यामध्ये महापालिका आयुक्त प्रवीण सिंह परदेशी, अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह सह आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त, सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख तसेच कार्यकारी अभियंता पदापर्यंतचे सर्व अधिकारी वर्ग आदींनी हा चित्रपट पाहिला. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांना कुटुंबासह उपस्थित राहण्याचे निमंत्रण देत आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आणण्याचे काम केले. या चित्रपटाचा नायक अक्षय कुमार हा स्वतः या शो साठी उपस्थित होता आणि त्याने महापलिका अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामाचे कौतुक केले. महापालिकेचे कामगार कर्मचारी खरोखरच उत्कृष्ट काम करत असून त्यांचे काम खरोखरच गौरवास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

विरंगुळा म्हणून या शो चे आयोजन

महापालिकेचे कर्मचारी सतत तणावाखाली काम करत असतात. त्यामुळे त्यांच्यावरील तणाव कमी करून एक विरंगुळा म्हणून या शो चे आयोजन केले होते. कामात व्यस्त असल्याने त्यांना आपल्याला कुटुंबाला वेळ देता येत नाही, त्यामुळे कुटुंबासह त्यांना हा चित्रपट पाहता यावा म्हणून या शो चे आयोजन केल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यापूर्वी आयुक्तांनी आपल्या पहिल्या अधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठकीत दहा मिनिटे ध्यान धारणा करायला लावत अधिकारी कर्मचारी यांच्यावरील तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी ध्यान धरणाचे विशेष आयोजन करत कामगारांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.


हेही वाचा – अटकेच्या भीतीने पी. चिंदबरम झाले ‘गायब’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -