घरCORONA UPDATEVideo: नातेवाईक पुढे न आल्याने नगरसेवकाने केले मृतांवर अंत्यसंस्कार

Video: नातेवाईक पुढे न आल्याने नगरसेवकाने केले मृतांवर अंत्यसंस्कार

Subscribe

कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास पुढे येत नाही. त्यामुळे अनेक मृतदेह पडून राहत असल्याने कुर्ला येथील शिवसेना पुरस्कृत नगरसेवक किरण लांडगे यांनी यासाठी पुढाकार घेत घाटकोपर असल्फा भागातील चार मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. क्वारंटाईन असलेल्या नातेवाईकांच्या परवानगीने चार रुग्णांचे मृतदेह लांडगे यांनी ताब्यात घेत कुर्ला आणि भोईवाडा येथील स्मशानभूमील अंत्यंसंस्कार केले.

मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत १२७९ रुग्णांचे मृत्यू झाले असून अनेक मृत व्यक्तींचे नातेवाईक क्वारंटाईनमध्ये असल्याने त्यांना मृतदेह ताब्यात घेताना अडचणी येतात. तर बहुतांशी मृतांचे नातेवाईक कोरोनाची लागण होईल या भीतीने मृतदेह ताब्यात घेण्यास असमर्थता दर्शवतात. त्यामुळे मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास अडचणी येत आहे. वडाळा येथील एका मृत व्यक्तीवर पोलिसांनी नातेवाईक पुढे न आल्यामुळे अंत्यसंस्कार केले. त्यामुळे याबाबत उलटसुलट वृत्त पसरलेले असून नातेवाईकांनी २७ तास उलटूनही मृतदेह ताब्यात न घेतल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत मृतदेह शवागारात ठेवणे शक्य नसल्याने त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

- Advertisement -

मात्र, आतापर्यंत नातेवाईक क्वारंटाईनमध्ये असल्याने तसेच त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे शिवसेना पुरस्कृत अपक्ष नगरसेवक किरण लांडगे यांनी आतापर्यंत अशाप्रकारे ४ मृतदेत ताब्यात घेवून नातेवाईकांच्या संमतीने अंत्यसंस्कार केले आहे. कुर्ला बैलबाजार आणि भोईवाडा येथील स्मशानभूमीत आपण एकूण चार मृतांवर अंत्यसंस्कार केले आहे. असल्फा येथे राहणारे व्यक्ती होते. नातेवाईकांशी संपर्क साधून तसेच त्यांच्या पूर्वसंमतीने आम्ही अशाप्रकारे चार मृतदेह ताब्यात घेवून अंत्यसंस्कार केले असल्याचे किरण लांडगे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मोहित भारतीयने मागितली महापालिकेकडे परवानगी

कोरोनाबाधित मृताचा देह ताब्यात घेवून अंत्यसंस्कार करण्यास अनेक नातेवाईक पुढे येत नसल्याने आता भाजपचे मुंबई सरचिटणीस मोहित भारतीय यांनी पुढाकार घेतला आहे. अशाप्रकारच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ज्या मृतदेहाचा ताबा घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक काही कारणास्तव पुढे येऊ शकले नाहीत, अशा पार्थिवाचे सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी फॉउंडेशनने घेण्याचे ठरविले आहे असे भारतीय यांनी पत्रात म्हटले आहे. महापालिकेकडून परवानगी मिळाल्यास फाउंडेशनच्यावतीने मृतदेह शवागारातून उचलण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करेल. रुग्णालयाच्या शवागारातून स्मशानभूमीत नेण्यात येईल आणि तेथे प्रत्येक पार्थिवावर पूर्ण सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येईल, असे पत्रात नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -