घरमुंबईमुंबईच्या फूटपाथवरचे पेव्हरब्लॉक होणार गायब!

मुंबईच्या फूटपाथवरचे पेव्हरब्लॉक होणार गायब!

Subscribe

पेव्हरब्लॉक कायमचेच काढून त्याठिकाणी क्रॉक्रीटच्या आकर्षक पदपथ तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबईतील फूटपाथची सुधारणा केल्यानंतरही अनेक ठिकाणी पेव्हरब्लॉक उखडले गेले आहे. असमांतर असलेल्या पेव्हरब्लॉकमुळे मुंबईकरांची आदळआपट होत रक्तबंबाळ होण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यामुळे यापुढे पदपथांवरील पेव्हरब्लॉक कायमचेच काढून त्याठिकाणी क्रॉक्रीटच्या आकर्षक पदपथ तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेने यासाठी नवीन मार्गदर्शक धोरण बनवून पेव्हरब्लॉकचा वापर न करता कॉक्रीटचेच पदपथ तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत संबंधित विभागांना दिले.

आयुक्तांनाही वाटते भीती!

मुंबईतील पदपथावरून चालताना आपल्या आईवडिलांना भीती वाटते, अशा प्रकारची हतबलताच महापालिका आयुक्तांनी दोन वर्षांपूर्वी व्यक्त केली होती. परंतु त्यानंतरही पदपथांच्या कामांमध्ये सुधारणा झालेली नाही. ‘अजोय मेहतांता भीती वाटते… तरीही फुटपाथ उखडलेले’ या मथळ्याखाली ‘आपलं महानगर’ने १९ डिसेंबर २०१८ रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत स्वतंत्र पदपथ धोरणाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना विभागाला केल्या होत्या. त्यानुसार शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत रस्ते विभागाच्यावतीने पदपथांच्या सुधारणांच्याद्ष्टीकोनातून सुधारीत धोरणाबाबत सादरीकरण करण्यात आले.

- Advertisement -

सिमेंट-काँक्रिटचे फुटपाथ!

मुंबईतील पदपथ हे चालण्यासाठी सोयीचे, सलग, समतल आणि सुकर असावेत, यासाठी गेले काही वर्ष महापालिका सातत्याने नियोजनबद्ध प्रयत्न करीत आहे. याकरीता महापालिकेने स्वतंत्र पदपथ धोरणाची अंमलबजावणी यापूर्वीच सुरु केली आहे. परंतु पदपथ धोरणाची अंमलबजावणी करत असताना लक्षात आलेल्या बाबीं, आव्हाने व समस्या लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आता सुधारित पदपथ धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे बनवले जाणारे नवीन पदपथ हे सुधारित धोरणानुसारच करण्यात येणार आहेत. त्यामुळे यापुढे सर्व पदपथ हे ’सिमेंट कॉन्क्रीट’चे केले जाणार आहेत. तसेच टप्प्या टप्प्याने सध्या असलेल्या ’पेव्हर ब्लॉक’च्या पदपथांचे रुपांतर हे सिमेंट कॉन्क्रीटच्या पदपथांमध्ये रुपांतर केले जाणार आहेत.

पदपथांवर यापुढे स्टॉल्सही नाहीत

मुंबईतील पदपथ हे प्रथम नागरिकांसाठी चालण्यास आहेत. त्यावर कोणतेही बांधकाम नसावे. त्यामुळे पदपथ हे नागरिकांसाठी चालण्यास असल्याने यापुढे पदपथांवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा स्टॉल्स बनविण्याच्या परवानग्या न देण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे पदपथांसाठी स्वतंत्र धोरण राबवून त्याची अंमलबजावणी करतानाच, त्यावरील अडथळा ठरणारी बांधकामे ठेवली जाणार नाहीत.

पदपथांची कशाप्रकारे होणार सुधारणा?

  • ६० फुटी रुंदी असणा-या रस्त्याचे पदपथ हे ’पेव्हर ब्लॉक’चे असल्यास ते आता नवीन धोरणानुसार ’सिमेंट कॉन्क्रीट’चे बनवले जातील. त्यावर ’मार्बल चिप’चे फिनीशिंग किंवा ’ब्रुमिंग टेक्श्चर’ असेल.
  • ९० फूट रुंदी असणा-या रस्त्यांचे पदपथ आणि २ मीटरपेक्षा अधिक रुंदी असणारे पदपथ हे ’स्टेन्सिल कॉन्क्रीट’ किंवा ’सिमेंट कॉन्क्रीट’चे असतील. त्यावरही ’मार्बल चिप’चे फिनीशिंग किंवा ’ब्रुमिंग टेक्श्चर’ असेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -