घरमुंबईमहापालिका कर्मचार्‍यांना यंदाही १५ हजार रुपये दिवाळी बोनस!

महापालिका कर्मचार्‍यांना यंदाही १५ हजार रुपये दिवाळी बोनस!

Subscribe

यंदा कोणत्याही कामगार संघटनेच्या मागणीशिवाय प्रशासनाने मागील वर्षी प्रमाणेच कर्मचार्‍यांना १५ हजार रुपयांचे सानुग्रह देण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे महापालिका कर्मचार्‍यांना दिवाळी भेट म्हणून सानुग्रह अनुदान मंजूर करता येत नसल्याने यंदा कोणत्याही कामगार संघटनेच्या मागणीशिवाय प्रशासनाने मागील वर्षी प्रमाणेच कर्मचार्‍यांना १५ हजार रुपयांचे सानुग्रह देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाने याबाबतचे परिपत्रकच बुधवारी जारी केले आहे. त्यामुळे आगामी वेतनामध्ये या सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचार्‍यांच्या वेतनात जमा केली जाणार आहे.


हेही वाचा – शाळांच्या देखभाल, स्वच्छतेसाठी निविदा न काढताच कंत्राट

यंदा बोनसमध्ये वाढ नाही

आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आचारसंहितेच्या भीतीमुळे प्रशासनाने पूर्णवेळ महापालिका कर्मचार्‍यांना प्रत्येकी सरसकट १५ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या नियमित वेतन श्रेणीतील पूर्णवेळ महापालिका कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त हे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. मात्र या सानुग्रह अनुदानाचा लाभ एप्रिल २०१९नंतर रुजू झालेल्या कर्मचार्‍यांना तसेच अधिकार्‍यांना मिळणार नाही. तसेच शासकीय वेतनश्रेणी लागू असलेले माध्यमिक शाळांमधील कर्मचारी, अंशकालिन कामगार, कर्मचारी तसेच मानसेवी कर्मचारी यांना याचा लाभ मिळणार नाही. ही रक्कम एसीएसद्वारे जमा करण्यात येणार आहे. मागील वर्षी या कर्मचार्‍यांना १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्याआधीच्या वर्षी १४ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले. त्यामुळे मागील वर्षी ५०० रुपयांची वाढ करून १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. परंतु यंदा मात्र, त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -