पालिका वाटणार मोफत कापडी पिशव्या

राज्यात प्लास्टिक बंदी असूनही अजूनही प्लास्टिकचा वापर केला जात आहे. यावर अंकूश लावण्यासाठी पालिका आता कापडी पिशव्या लोकांना वाटणार आहे.

Mumbai
Plastic Bags
प्रातिनिधिक फोटो

राज्यात सध्या प्लास्टिक बंदी सुरु आहे. लोकांना प्लास्टीक वापरण्यापासून दूर करावे यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. तरीही शहरात छुप्यापद्धतीने प्लास्टिकचा वापर सुरुच आहे. हा वापर थांबावा म्हणून पालिका अधिकाऱ्यांकडून धाडी टाकण्यात येतात. कारावाई नंतरही प्लास्टिकचा वापर थांबत नसल्याचे चित्र आहे. लोकांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा यासाठी महानगर पालिका नवी मोहीम राबवत आहे. या मोहीमेअंतर्गत पालिका आता मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करणार आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रकल्पाला मान्यता दिला आहे. या प्रकल्पाला नगरसेवक निधीचा वापर करण्यात येणार आहे. आयुक्तांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाच्या मंजुरीसाठी गेला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

२३ जून पासून करण्यात आली होती बंदी

राज्यात २३ पासून प्लास्टिग बंदी करण्यात आली आहे. यामुळे घाऊक दुकानांसह किरकोळ बाजार, मॉल, हॉटेल या ठिकाणी प्लास्टिक बंदी करण्यात आली होती. तर दुसरीकडे फेरीवाले, मटन, चिनक, मासळी बाजार,फुल बाजार, व अण्य छोट्या ठिकाणी प्लास्टिकचा वापर सुरुच आहे. त्यामुळे पुर्णपणे प्लास्टिकबंदी झालेली नसल्याचे चित्र आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाटी पालिकेने अनेक प्रयत्न केले. यामध्ये जनजागृती करण्यापासून ते दंड ठोठावण्यापर्यंतचे पर्याय अवलंबवण्यात आले होते.

नगरसेवक निधी वापरला जाणार

मोफत पिशव्या दिल्यास प्लास्टिकचा वापर टाळता येईल यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. नकरसेवकांनी प्रशासनाच्या सभागृहात ही सूचना केली होती. मात्र कापडी पिशव्यांचे वापट करण्याची तरतूद अर्थसंकल्पात नसल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे याला लागणारा खर्च हा नगरसेवकांच्या निधीतूनच जमा करण्याचा पर्यायसमोर ठेवण्यात आला. अखेर या पर्यायाला मंजूरी देण्यात आली. या अंतरर्गत पालिकांकडून लोकांना कापडी पिशव्यांची वाटप केली जाणार आहे. लोकांना पिशव्या कधी मिळाणार या बद्दल अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here