घरCORONA UPDATELockDown: 'त्या' प्रवाशांना मेडिकल सर्टिफिकेट द्या; पालिकेचा आदेश जारी

LockDown: ‘त्या’ प्रवाशांना मेडिकल सर्टिफिकेट द्या; पालिकेचा आदेश जारी

Subscribe

मुंबई महापालिका आणि आरोग्य विभागाने सर्व मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि पालिका दवाखाना तसेच मेडिकल व्यवसाचिक यांना लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी प्रवासी कामगार, यात्री, विद्यार्थी आणि अन्य लोकांना मेडिकल सर्टिफिकेट देण्याचे आदेश जारी केले आहेत. राज्यात अडकलेल्या परप्रांतियांना त्यांच्या गावी, घरी जाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. तसेच पत्रक त्यांनी काही दिवसांपासून काढले होते. त्यामुळे आपापल्या गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व प्रवाशांची मेडिकल चाचणी केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांना राज्यातून बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल, असेही सरकारने नमूद केले आहे.

दरम्यान, मुंबईतून बाहेर जाणाऱ्या कामगार, मजून, विद्यार्थी यात्रेकरू यांची स्क्रिनिंग आणि मेडिकल चाचणी करण्याचे आदेश पालिकेने सर्व मेडिकल यंत्रणांना दिले आहेत. यामध्ये शहरातील खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिक्सचाही उल्लेख पालिकेने केला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत येणाऱ्या सर्वांना आता मुंबईबाहेर जाणाऱ्यांना मेडिक सर्टिफिकेट देण्याच्या कामात सहभाग घ्यायचा आहे. केंद्र सरकारने नियम आणि अटी लागू करून कामगार, मजून, विद्यार्थी आणि यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यातील महत्त्वाची अट म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांची मेडिकल चाचणी ही आहे. मुंबई हा रेड झोनमध्ये येत असून येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतून बाहेर जाताना कोणताही प्रवासी कोरोना संसर्गाचा प्रवाह तर बनत नाही ना, याची खबरदारी पालिका प्रशासनाकडून घेतली जात आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -