घरमुंबईपालिकेने बजाविले १०८ शिक्षकांना मेमो

पालिकेने बजाविले १०८ शिक्षकांना मेमो

Subscribe

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा खालावत असलेला दर्जा सुधारावा यासाठी पालिका शिक्षण विभागाने आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला आहे. शिक्षणाची जबाबादारी नेटाने न सांभळणार्‍या शिक्षकांवर थेट पगारवाढ रोखण्याचेी कारवाईचे संकेत दिले आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा खालावत असलेला दर्जा सुधारावा यासाठी पालिका शिक्षण विभागाने आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला आहे. शिक्षणाची जबाबादारी नेटाने न सांभळणार्‍या शिक्षकांवर थेट पगारवाढ रोखण्याचेी कारवाईचे संकेत दिले आहेत. गेल्यावर्षीपासून अंमलात आलेल्या नव्या धोरणानुसार तब्बल १०८ शिक्षकांना मेमो बजाविले असून वरील कारवाई केल्याचे कळते. तर दुसरीकडे उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या १२९ शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरव देखील केला आहे. दरम्यान, अशैक्षणिक कामांचा बोजा वाढत असताना पालिकेने केलेल्या या कारवाईमुळे पालिका शाळांतील शिक्षकांमध्ये नाराजीची सूर उमटू लागले असून येत्या काळात हा विषय चिघळण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेतील वाढलेली विद्यार्थी गळती आणि प्रश्नचिन्ह निर्माण झालेला शैक्षणिक गुणवत्तेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळे मुंबई महापालिका शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी गेल्यावर्षी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नवे धोरण ठरविण्यात आले होते. या नव्या धोरणानुसार कामगिरी सुधारणार्‍या शाळांना प्रोत्साहन तर कामगिरी खालवणार्‍या शाळांच्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे निश्चित केले आहे. या परिपत्रकानुसार शिक्षकांनी कोणकोणती कामे करायची याची सर्व माहिती देण्यात आलेली असून त्याची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून करण्यात आली असून त्यानुसारच वरील कारवाई करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

काय होते धोरण

ज्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षक या परिपत्रकानुसार २५ निकष पूर्ण करतील आणि संकलित मूल्यमापन २ मध्ये अ श्रेणी प्राप्त करतीत अशा शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून प्रशस्तीपत्रक आणि महापौर पुरस्काराकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे. तर ज्या शाळा २० निकष पूर्ण करीत आणि संललित मूल्यमापन श्रेणी २ मध्ये ब श्रेणी प्राप्त करतील अशांनाही प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तर ९ वी आणि १० वीच्या शिक्षकांसाठी जर प्रत्येक विषयांचा निकाल १०० टक्के लागल्यास प्रशस्तीपत्रक आणि महापौर पुरस्कारांत प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर वरील निकषांची पूर्तता न करणार्‍या शिक्षकांवर थेट दंडाची कारवाई करण्याचा निर्णय आहे. प्राथमिक शाळांतील शिक्षकांसाठी २० निकष पूर्ण न करणार्‍या शिक्षकांना प्रथम वेळेस १०० रूपये दंड, दुसर्‍यांदा हंगामी स्वरूपात एक वेतनवाढ रोखण्याच्या या धोरणात निश्चित करण्यात आले आहे. तर तिसर्‍या वेळेस कायम स्वरूपात एक वेतनवाळ रोखण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तर माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी ज्या ९ वी आणि दहावीच्या शाळांचा निकाल ८० टक्कांपेक्षा कमी लागल्यास त्यांना प्रथम १००० रूपये दंड, दुसर्‍यांदा २ हजार रूपये दंड आणि तिसर्‍यांदा कायम स्वरूपी वेतनवाढ रोखण्याचा कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

शिक्षकांमध्ये नाराजी

दरम्यान, पालिकेकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे सध्या शिक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. गेल्यावर्षीपासून सरल असो किंवा शाळाबाह्य शोधण्याची मोहीम यासारख्या अनेक कामांमुळे सध्या मुंबईतील शिक्षक या अशैक्षणिक कामेच करत असून विद्यार्थ्यांना शिकवण्यास कमी वेळ मिळत असल्याची तक्रार शिक्षकांकडून करण्यात येत आहे. एकीकडे शिक्षक अशैक्षणिक कामांत व्यस्त असताना पालिकेने अशाप्रकारची कारवाई करणे हे जाचक असल्याची प्रतिक्रिया मुंबई महापालिकेच्या अनेक मुख्याध्यापकांकडून करण्यात आली आहे.

पालिकेने गेल्यावर्षीपासून नवे धोरण अंमलात आणले आहे. त्यानुसार शिक्षकांना मेमो बजाविण्यात आले आहेत. पण त्याचवेळेस ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांना प्रोत्साहन देखील दिले आहे.
– महेश पारकर, शिक्षणाधिकारी, मुंंबई महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -