‘प्रिन्स’च्या नुकसान भरपाईचा निर्णय बुधवारी

standing committee demand for suspended the kem dean

केईएम रुग्णालयातील दुघर्टनेत जखमी झालेल्या प्रिन्स राजभरच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत असतानाच प्रशासनाने हा निर्णय महापौरांच्या स्तरावर घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रिन्सला आर्थिक मदत देण्याबाबत खड्डे तसेच झाड पडून किंवा नाल्यात आणि मॅनहोल्समध्ये पडून होणार्‍या दुघर्टनांबाबत निर्णय घेण्यात येईल. यासाठी २० नोव्हेंबर रोजी गटनेत्यांची सभा बोलावली जाईल आणि त्यामध्ये प्रिन्ससारख्या सर्व दुर्घटनांमधील लोकांना देण्यात येणार्‍या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला जाईल, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केले.

..तर प्रिन्सच्या कुटुंबाला मदत का नाही?

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रिन्ससंदर्भात मुद्दा उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक रुग्णालय अग्नि-प्रतिबंधक असावे अशी मागणी केली. या प्रकरणात पोलिस एफआयआर केला असून मुलाचा एका बाजुला हात कापला गेला आहे, तर दुसरीकडे त्या मुलाच्या वडिलांची नोकरीही गेली असल्याचे सांगितले. प्रिन्सला नुकसान भरपाई मिळायला हवी, पण यापूर्वीचा आणि यापुढील सर्व उपचाराचा खर्च माफ करत महापालिकेने तो स्वत: करावा, अशी सूचना राष्ट्वादी कॉग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केल्या. प्रिन्स हा मुलगा २२ टक्के भाजला आहे. पण हाताला गँगरीन झाल्याने तो कापला. त्यामुळे जर मालाड दुघर्टनेच्या वेळी कोणतेही धोरण नसताना जर त्यांना दहा लाख रुपये दिले जात असतील प्रिन्सच्या कुटुंबाला देण्यास काय हरकत आहे, असा सवाल अश्रफ आझमी यांनी केला.

मालाड दुर्घटनेतील पीडितांनाही दिली होती मदत

नुकसान भरपाई देण्यासाठी महापालिकेने धोरण बनवण्याची मागणी विनोद मिश्रा यांनी केली. भाजपचे अभिजित सामंत यांनी प्रशासन जर दुर्लक्ष करणार असेल तर सर्व नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन प्रिन्सच्या पुढील आयुष्यातील देखभाल करता आपली जबाबदारी म्हणून द्यावी अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी, मालाड दुघर्टनेतील मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत महापौरांच्या स्तरावर निर्णय घेऊन दिली गेली होती. त्यामुळे प्रिन्ससंदर्भात महापौर स्तरावर याबाबत निर्णय घेतला गेल्यास तशी मदत देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – प्रिन्सच्या मदतीसाठी मुंबईकरांची धाव