घरमुंबईघाटकोपरमधील ‘एलबीएस’चा विळखा सुटला, ७९ बांधकामे हटवली!

घाटकोपरमधील ‘एलबीएस’चा विळखा सुटला, ७९ बांधकामे हटवली!

Subscribe

लाल बहादूर शास्त्री मार्गावरील घाटकोपर परिसरातील व्यावसायिक बांधकामांवर महापालिकेच्या एन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. याच विभागाच्या वतीने मागील आठवड्यात देखील कारवाई करण्यात आली होती. परंतु या आठवड्यात मंगळवारी पुन्हा एकदा मोठी कारवाई हाती घेत सुमारे ३७ हजार ६७३ फूट एवढ्या जागेतील तब्बल ७९ पात्र व्यवसायिक बांधकामे तोडण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांत व्यवसायिक स्वरुपाच्या बांधकामांवर करण्यात आलेली ही मोठी कारवाई असल्याचे एन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी स्पष्ट केले आहे.

लाल बहादूर शास्त्री मार्गावरील गोपाळ भवन ते श्रेयस जंक्शन दरम्यान आणि लगतच्या परिसरात अनेकदा वाहतूक कोंडी होत असे. ही कोंडी सुटावी आणि लाल बहादूर शास्त्री मार्गावरची वाहतूक अधिक सुलभ होण्यासाठी सदर ७९ अनधिकृत बांधकामे हटवून रस्ता रेषेनुसार रस्त्याचे रुंदीकरण करण्याची गरज होती. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील गोपाळ भवन ते श्रेयस जंक्शन दरम्यान सुमारे ८२० फूट लांबीच्या रस्त्यालगत दोन्ही बाजूला प्रत्येकी सुमारे २३ फुटांच्या जागेत, अर्थात सुमारे ३७ हजार ६०० चौरस फूट एवढ्या जागेत असणारी ७९ बांधकामे आज करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान हटविण्यात आली आहेत.

- Advertisement -

कारवाईसाठी ४१ पोलिसांचं संरक्षण!

ही बांधकामे हटवताना स्थानिक स्तरावर मोठा विरोध झाला. तथापि, मुंबई पोलिसांच्या सहकार्यामुळे ही कारवाई योग्य प्रकारे करणे महापालिका प्रशासनाला शक्य झाले. या कारवाईसाठी ४१ पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. तर महापालिकेचे ७५ कामगार-कर्मचारी-अधिकारी देखील या कारवाईसाठी अव्याहतपणे कार्यरत होते. लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या रस्ता रेषेनुसार(रोड लाईन) सदर रस्ता १०० फूटी करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही या बांधकामांमुळे रखडलेली होती. त्यामुळे आज कारवाई करण्यात येऊन सदर ७९ बांधकामे हटवण्यात आली आहेत. परिमंडळ ६ चे उपायुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे आंबी यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -