घरमुंबईनवनिर्वाचित आयुक्त प्रवीण परदेशी यंच्यासमोर मुंबईतील हे मोठं आव्हान

नवनिर्वाचित आयुक्त प्रवीण परदेशी यंच्यासमोर मुंबईतील हे मोठं आव्हान

Subscribe

मुंबईत पावसाळा सुरु झाला की अनेक ठिकाणी अव्यवस्थेचा फटका मुंबईकरांना बसतो. मात्र यंदा तो बसू नये, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचा निर्धार मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पदभार स्विकारल्यानंतर व्यक्त केला.

मुंबईत पावसाळा सुरु झाला की अनेक ठिकाणी अव्यवस्थेचा फटका मुंबईकरांना बसतो. मात्र यंदा तो बसू नये, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचा निर्धार मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज, सोमवारी पदभार स्विकारल्यानंतर व्यक्त केला. पावसाळ्यातील आव्हानं समोर आहेत. मुंबईतील पाणी तुंबणार्‍या ठिकाणी विशेष लक्ष देणार, नालेसफाईची कामे त्वरीत मार्गी लावणार. मुंबईकरांना यंदाचा पावसाळा सुसह्य जाईल यासाठी प्रयत्न करणार’असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. तसेच बेस्टच्या प्रश्नावरही लवकरच तोडगा काढण्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नुकतीच प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज मावळते आयुक्त अजोय मेहता यांच्याकडून पदभार स्विकारल्यानंतर प्रवीण परदेशी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना प्रवीण परदेशी म्हणाले की, इतर अनेक देशांमध्ये ज्याठिकाणी मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. त्या देशांतही कोस्टल रोडसारखे प्रोजेक्ट आहेत. कोस्टल रोड हा मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प आहे. सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करणार. यासाठी कोस्टल रोडबाबत कोळी बांधवांमध्ये असलेली नाराजी दूर करणार, त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज असल्याचं देखील परदेशी यांनी सांगितले.

- Advertisement -

तर बेस्टसारख्या गंभीर प्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले की, शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा उत्तम पर्याय आहे. मुंबईकरांच्या दृष्टीने बेस्ट ही अत्यावश्यक बाब असून ती जगवण्यासाठी चार ते पाच हजार बस भाड्याने घेऊन प्रशासकीय खर्च कमी करता येईल. याचा अर्थ हे बेस्टचे खासगीकरण नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर बेस्ट उपक्रमावरील विविध प्रकारचे खर्च कमी करायला हवेत. त्यासाठी भाड्याच्या बसचा पर्याय आहे. मात्र तो कामगार संघटनांना मान्य नाही, याप्रश्नी कामगार संघटनांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. बस भाड्याने घेतल्यास एकही कर्मचारी कमी केला जाणार नाही, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.

दरवर्षी, नालेसफाईवरुन पालिका प्रशासनावर धारेवर धरले जाते. याबद्दल त्यांना विचारणा केली असता परदेशी म्हणाले की, नालेसफाईचे काम कसे सुरू आहे, किती काम पूर्ण झाले, याचा माग जीपीएस यंत्रणेद्वारे घेतला जाईल. कामाची छायाचित्रे कंत्राटदाराला जोडावी लागतील, तो पुरावा म्हणून वापरता येईल. मागीलवर्षीपेक्षा यंदा जादा गाळ नाल्यातून काढला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -