घरमुंबईमुंबईत पाणीकपात लागू केलीत, पण पाणी गळतीचं काय?

मुंबईत पाणीकपात लागू केलीत, पण पाणी गळतीचं काय?

Subscribe

दुष्काळ असूनही पाईपलाइन फुटलेली असल्याकारणाने ३० टक्के पाणी वाया जात असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईत सध्या १० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. मात्र मुंबईतच अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनमधून होणाऱ्या गळतीकडे सर्वांचे दुर्लक्षच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बांद्रा पश्चिम, अंधेरी, भांडूप, मुलुंड, पवई, घाटकोपर आणि बोरीवलीसारख्या ठिकाणी पाईपलाइनमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे सुमारे ६५ कोटी लिटर पाणी दररोज वाया जात आहे. हा आकडा तर पुण्याचा रोजचा पाणी पुरवठा आहे. मात्र मुंबई महानगर पालिकेकडूनही आणि जलव्यवस्थापन विभागाकडूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे दररोज मुंबईकरांच्या हक्काचे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

कॉन्ट्रॅक्टरच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

बीएमसी दररोज ३८० कोटी लिटर पाणी मुंबईला पुरवते. त्यापैकी सुमारे ३० टक्के पाणी रोज वाया जात असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दरवर्षी मुंबई महानगर पालिका ३ ते ६ कोटी रुपये फक्त पाईपलाईनमधून होणाऱ्या पाण्याच्या गळतीच्या दुरुस्ती कामासाठी खर्च करते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबई मिररला सांगितले की, ‘आम्ही पाणी गळतीच्या समस्येची पाहणी करत आहोत. आम्ही यासाठी कॉन्ट्रॅक्ट्स सुद्धा देतो. मुंबईच्या ४, ५ आणि ६ झोनसाठी टेंडर दिले जातात. यात के-पश्चिम, एच-पश्चिम, एल, पी-दक्षिण, पी-उत्तर, एम-पश्चिम, एन, एस आणि टी वॉर्डचा समावेश आहे. परंतु या टेंडरसाठी कॉन्ट्रॅक्टर्सनी आधीच ३० टक्के कमी किंमतीचे टेंडर सादर केले आहे. त्यामुळे साहजिकच इतक्या कमी किंमतीमध्ये चांगली सेवा पुरवणं कॉन्ट्रॅक्टरला शक्य होणार नाही, असा अंदाज पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शहराला २४ तास पाणी उपलब्ध करून देणारे गेले कुठे ?

पाणीगळतीसाठी ‘साऊंडिंग रॉड’चा वापर

बीएमसी अर्थात मुंबई महानगर पालिका मुंबईतल्या एकूण २४ वॉर्डची व्यवस्था पाहाते. पाईपलाईनमधून होणारी गळती तपासण्यासाठी पालिकेकडून ‘साउंडिंग रॉड’ नावाचे यंत्र वापरले जाते. या यंत्राचा वापर करून जमिनीखालील गळती असलेली ठिकाणं शोधली जातात. हे यंत्र १.२ ते १.५ मीटर लांबीचे असून त्याच्या वरच्या भागात २.५ मिलीमीटर व्यासाचे आणि १० मिलीमीटर आकाराचे छिद्र आहे. याच्या आत एक अगदी छोट्या आकाराचा चेंडू आहे. आवाजाच्या तीव्रतेनुसार त्याच्या आतला चेंडू हलतो आणि पाणी गळतीचं ठिकाण सापडतं. पण आता हे यंत्रही कितपत काम करतयं, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. अजूनही मुंबई महानगर पालिका पाणी गळतीवर पूर्णपणे मात करण्यात अपयशी ठरल्यामुळे पालिकेच्या एकूण कारभारावरच टीका होऊ लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -