घरमुंबईएल.बी.एस रोडवरील भांडुपमधली अतिक्रमणे हटली, ४५ बांधकामांवर कारवाई!

एल.बी.एस रोडवरील भांडुपमधली अतिक्रमणे हटली, ४५ बांधकामांवर कारवाई!

Subscribe

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या लालबहादूर शास्त्री रोडच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे कुर्ला, घाटकोपर येथील एल.बी.एस मार्गाच्या रुंदीकरणात अडसर ठरलेल्या बांधकामांवर कारवाई केली जात असताना भांडुप येथील या मार्गावरील १६ बांधकामांवर एस विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. ही बांधकामे हटवताना रस्ते रुंदीकरणाची जागा मोकळी केली.

एमएमआरडीएकडून ताब्यात घेण्यात आलेल्या एल.बी.एस. मार्गाच्या रुंदीकरणाचं काम मागील दहा ते बारा वर्षांपासून रखडलं आहे. त्यामुळे या रखडलेल्या मार्गातील अतिक्रमणे काढून युद्धपातळीवर कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे भांडुप परिसरातील एल.बी.एस. मार्गावर १६ बांधकामे बाधित होती. या सर्व बांधकामांवर एस. विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी धडक कारवाई केली. त्यामुळे भांडुपमधील एल.बी.एस. मार्गावरील अतिक्रमणाचा विळखा सोडवण्यात महापालिकेला यश आले आहे. या रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटली जाणार आहे.

- Advertisement -

याशिवाय भांडुप पूर्व येथील एम. डी. केणी मार्गावरील ८ बांधकामांवरही महापालिकेने कारवाई करत या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात यश मिळवले आहे. तर गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या भांडुपमधील २१ बांधकामांवरही कारवाई करण्यात आली असल्याचे एस. विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी स्पष्ट केले. या मार्गावरील या अतिक्रमणांमुळे बॉटलनेक तयार झाला होता. हा बॉटलनेक काढण्यात आल्याने रुंदीकरणाचा मार्ग सुकर झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -