घरमुंबईअतिधोकादायक शौचालयांसाठी पालिका १६ कोटी खर्च करणार

अतिधोकादायक शौचालयांसाठी पालिका १६ कोटी खर्च करणार

Subscribe

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील धोकादायक शौचालयांमुळे दुर्घटना घडत असल्याने पालिकेकडून अशा शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जात आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करून अतिधोकादायक शौचालये तोडून नव्याने उभारली जाणार आहेत. त्यासाठी पालिका १६ कोटी ३६ लाख रुपये खर्च करणार आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील धोकादायक शौचालयांमुळे दुर्घटना घडत असल्याने पालिकेकडून अशा शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जात आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करून अतिधोकादायक शौचालये तोडून नव्याने उभारली जाणार आहेत. त्यासाठी पालिका १६ कोटी ३६ लाख रुपये खर्च करणार आहे. पालिकेच्या ९ वॉर्डमधील शौचालयांचे काम रखडले असून त्यांना १५ सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली.

मुंबईतील शौचालयांच्या टाक्यांची वेळेवर सफाई केली जात नाही. यामुळे या टाक्यांमध्ये गॅस जमा होऊन त्या फुटतात. तसेच शौचालयाचे बांधकाम योग्य प्रकारे केले नसल्याने शौचालये खचतात. अशा दुर्घटनांमध्ये गेल्या चार वर्षात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली जात होती. त्या अनुषंगाने पालिकेने धोकादायक शौचालयांचे ऑडिट करण्यास सुरुवात केली असल्याचे शंकरवार यांनी सांगितले. पालिकेने अद्याप १४१५ शौचालयांपैकी ९३४ शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. त्यातील ३८३ शौचालये अतिधोकादायक आहेत. पालिकेच्या डी, एच पूर्व, के पूर्व, एल, एम, एन, एस आणि टी या ९ वॉर्डमधील ३५५ शौचालयांचे ऑडिट अद्याप सुरु आहे. ९ वॉर्डमधील शौचालयांच्या ऑडिटसाठी १५ सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे. मुंबईमधील अतिधोकादायक शौचालयांच्या संख्येत वाढ होऊन खर्चही वाढेल अशी शक्यता शंकरवार यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

मुंबईत ३८3 शौचालये अतिधोकादायक असल्याने ती तोडून पुन्हा नव्याने बांधली जाणार आहेत. त्यासाठी पालिका १६ कोटी ३६ लाख खर्च करणार आहे. १८ सार्वजनिक शौचालयांची मोठ्या स्वरुपात दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी पालिका ५ कोटी ३५ लाख रुपये खर्च करणार आहे. तर १०२ शौचालयांची किरकोळ स्वरुपात दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी पालिका ५ कोटी ६ लाख रुपये खर्च करणार आहे.

शौचालयांच्या दुघर्टना

५ मार्च २०१५ – मानखुर्द महाराष्ट्रनगर साईबाबा चाळ, १ बळी
४ फेब्रुवारी २०१७ – मानखुर्द मंडालातील इंदिरा नगर लोहार चाळ, ३ बळी
२८ एप्रिल २०१८ – भांडुप टँक रोड, २ बळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -