मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी रोवला अमेरिकेत झेंडा

स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याच्या जिद्दीने दिले यश

mcgm students

मुंबई महापालिकेतील काही विद्यार्थ्यांशी मनाशी एक स्वप्न बाळगलं. ते स्वप्न प्रत्यक्ष साकारताना अनेकांनी आता मुंबईतून थेट आयआयटी ते अमेरिकन विद्यापिठात प्रवेश मिळवण्याची ध्येयपूर्ती साध्य केली आहे. बास्केटबॉल, लिबरल आर्ट अशा विविध क्षेत्रात आपल करिअर करू पाहणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना सामाजिक संघटनांनी मदतीचा हात पुढे केला. याच मदतीच्या जोरावर हे महापालिका शाळेतील विद्यार्थी आपल्या पंखांना बळ देऊ पाहत आहेत. सध्याच्या शैक्षणिक वर्षात अनेक नामवंत अशा शैक्षणिक संस्थांमध्ये हे विद्यार्थी प्रवेश मिळवण्याच्या तयारीत आहेत.

मुंबई महापालिकेच्या शाळांना मदत केलेल्या आकांक्षा फाऊंडेशनमार्फत एका विद्यार्थ्याने आयआयटी खरगपुरमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर इंग्लंडमधील व्हिटन कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला आहे. काही विद्यार्थ्यांना अशोक विद्यापिठात प्रवेश मिळाला. तर सहा विद्यार्थ्यांना कर्जत येथील कॉर्वस या अमेरिकन अकॅडमीत प्रवेश मिळाला आहे. या अकॅडमित एथलेटिक्स शिकवण्यात येते. आयआयटी खरगपूर येथे प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्याला आयआयटी बॉम्बे येथे शिकवणारे शिक्षक लाभल्यानेच त्याचे हे आयआयटीत प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे. मी एकदा आयआयटीचा कॅम्पस पाहिला होता. तसेच आयआयटीतून थेट नोकरीच्या संधी मिळतात हेदेखील मला सांगण्यात आले होते. तेव्हापासूनच मी आयआयटीत प्रवेश मिळवण्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते. गणित चांगल असल्यानेच आयआय़टीत प्रवेश मिळवायचे हे उदिष्ट मी मनाशी ठेवले होते. जेईई मेन परीक्षेत चांगले गुण मिळाले नसतानाही, जेईई एडव्हान्स प्रवेश प्रक्रियेत चांगले गुण मिळवता आल्यानेच मला ही संधी मिळाली. आयआयटी खरगपुर येथे प्रवेश मिळवलेला सुरज हा परळ अभ्युदय नगरचा रहिवासी आहे. येत्या शैक्षणिक वर्षात तो आयआयटी खरगपूर येथे मेटालर्जी विषयात आपल्या पदवीच्या शिक्षणाला सुरूवात करणार आहे.

विविध कॅम्पसमधील माजी विद्यार्थ्यांच्या मदतीनेच काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्याचे स्वप्न साकारता आले. व्हिटन कॉलेजच्या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून या एथेलेटिक्स कॉलेजमध्ये स्वप्न साकारता आल्याचे आलिया मुल्ला सांगते. कोविड १९ चे संकट पाहता हे स्वप्न पुर्ण होईल का अशी मनात भीती होती. पण माजी विद्यार्थ्यांच्या मदतीमुळेच आता हे स्वप्न साकार होणार आहे. आलिया आपल्या दोन बहिणींसह मुंबईत राहते. तिचे वडील हे बेस्ट बस ड्रायव्हर आहेत.

स्नेहा यादव, अंजली पांडे, काजल कोटेकर, लक्ष्मी यादव, सुरज गुप्ता आणि प्रभात मिश्रा यांनाही कॉर्वस अमेरिकन अकॅडमित प्रवेश मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना Hi5 फाऊंडेशनने मदत केली आहे. तर अंजली या विद्यार्थीनीची निवड ही एनबीए मुंबई टीममध्ये झाली आहे. तिला प्रोफेशनल बास्केटबॉल प्लेअर व्हायचे होते. आता कॉर्वस अकॅडमिच्या माध्यमातून ती डिप्लोमा पुर्ण करून पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. मुंबई महापालिका ही अंतरंग फाऊंडेशनच्या करिअर अवेर या कार्यक्रमाच्या माध्यमातून करिअरच्या विविध संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या करून देत असते. त्यांच्या आवडीनुसार आणि बुद्धी कौशल्यानुसार विद्यार्थ्यांना करिअरची निवड करण्याची संधी मिळते. या प्रक्रियेत काही चाचण्या होतात. त्यामध्ये तज्ञ आणि पालक यांच्याशी संवाद घडवून मुलांचे करिअर घडवून आणण्यासाठी संधी दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही देण्यात येते.