घरमुंबईगिरगावात महिला बचतगटांना पालिकेकडून जागा मिळणार

गिरगावात महिला बचतगटांना पालिकेकडून जागा मिळणार

Subscribe

मुंबईतील महिला बचतगटांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी पालिकेतर्फे कायमस्वरूपी स्टॉल देण्यात येणार आहेत. तसेच, दिव्यांग व्यक्ती व प्रकल्पबाधित व्यक्तींनाही प्रत्येकी एक स्टॉल देण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. गिरगाव येथील खोताची वाडी येथे मुंबईतील २४ प्रभागातील प्रत्येकी एका महिला बचतगटाला पालिकेतर्फे प्रत्येकी एक स्टॉल देण्यात येणार आहे. महिला बचतगटांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करता यावी व त्यातून त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी उत्पन्न मिळावे आणि त्यांना स्वावलंबी होता यावे या उद्देशाने पालिकेने त्यांना स्टॉल उपलब्ध करावेत, आशी मागणी पालिका सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी केली होती.

विशाखा राऊत यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन पालिका प्रशासनाने गिरगाव, खोताची वाडी येथे जागा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी २६ स्टॉल असून प्रत्येकी एक स्टॉल याप्रमाणे २४ प्रभागातील प्रत्येकी एका महिला बचतगटाला स्टॉल देण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -