घरमुंबईमहापालिका शाळांमधील इयत्ता ४ थी ते ७ वीच्या वर्गांमध्ये CCTV कॅमेरे!

महापालिका शाळांमधील इयत्ता ४ थी ते ७ वीच्या वर्गांमध्ये CCTV कॅमेरे!

Subscribe

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये CCTV बसवण्याची मागणी नगरसेवकांकडून झाल्यांनतर आता प्रत्यक्षात शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याची कार्यवाही हाती घेण्यात येत आहे. यामध्ये महापालिका शाळांमधील इयत्ता चौथी ते आठवीच्या वर्गांमध्ये कॅमेरे बसवले जाणार असून प्रत्येक शाळांच्या प्रवेश मार्गावर कॅमेरा बसवून त्याद्वारे विद्यार्थ्यांसह शाळांमध्ये येणार्‍या बाहेरील व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

इमारतीच्या मागील बाजूस देखील कॅमेरे

महापालिका शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका शुभदा गुडेकर यांनी खासगी शाळेमध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या दृष्कृत्याबाबत प्रश्न उपस्थित करत अशा प्रकारे महापालिका शाळेत काही घडल्यास प्रशासनाची काय उपाययोजना आहे? असा सवाल केला. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्यांनी प्रवेशद्वार, प्रत्येक मजल्यावरील व्हरांड्यात, तसेच इमारतीच्या मागील बाजूस CCTV कॅमेरे बसवण्याची मागणी केली.

- Advertisement -

सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांना उत्तर देताना, सहआयुक्त डॉ. आशुतोष सलिल यांनी ‘महापालिका शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याची कार्यवाही हाती घेण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक शाळांच्या प्रवेशद्वारांवर हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तर इयत्ता चौथी ते सातवीच्या वर्गांमध्ये कॅमेरे बसवले जाणार आहेत’, असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -