आता सार्वजनिक शौचालयांमध्ये तृतीयपंथीयांसाठीही स्वच्छतागृह!

Mumbai
now bmc cleanliness in mumbai by evening time
मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेच्या वतीने सार्वजनिक शौचालयांची उभारणी करताना पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाते. परंतु, राईट टू पीच्या लढ्यानंतर मुंबईत महिलांसाठीच्या स्वच्छता गृहांमध्येही वाढ होऊ लागली आहे. पण आता महिलांसोबतच तृतीयपंथीयांसाठी स्वच्छतागृह बांधण्याचा विचार प्रशासन करत आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने विविध अशासकीय संस्थांच्या समन्वयाने गर्दीच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली जाते. या सर्व शौचालयांचे व्यवस्थापन संबंधित संस्थांच्या माध्यमातून करण्यात येते. या शौचालयांमध्ये आतापर्यंत पुरुष आणि महिलांसाठी शौचकुपांची तसेच मुतारींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचधर्तीवर तृतियपंथी व्यक्तींसाठी सुविधा देण्यासंबंधी विचार करण्यात येईल, असे घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रमुख अभियंत्यांनी स्पष्ट केले.

तृतीयपंथीयांची गैरसोय

दोन वर्षांपूर्वी भाजपच्या नगरसेविका दक्षा पटेल यांनी ठरावाच्या सूचनेंतर्गत महापालिकेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात यावी, अशी मागणी केली होती. जेणेकरून तृतीयपंथीयांना दिलासा मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. मुंबईत मोक्याच्या ठिकाणी महिला आणि पुरुष यांच्याकरता स्वतंत्र व्यवस्था असलेली सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. यापुढेही बांधण्यात येतील. मात्र, असे असले तरी अशा शौचालयांचा वापर करताना तृतीयपंथीयांना संकोच वाटतो आणि त्यांची गैरसोय होते. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था असणे हितावह असल्याचे त्यांनी म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here