घरCORONA UPDATEBMC डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना देणार 'ताज' हॉटेलमधील जेवण कारण...

BMC डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना देणार ‘ताज’ हॉटेलमधील जेवण कारण…

Subscribe

दोन वेळच्या जेवणासाठी २९० रुपये मोजणार

कोरोनाच्या काळात ज्या ज्या संस्थांनी हातभार लावला होता, त्यांची परतफेड करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमधील डॉक्टर आणि निमवैदयकीय कर्मचारी यांच्यासाठी दुपारी व रात्रीच्या जेवणाची पाकिटे ‘टाटा’ संस्थेच्या माध्यमातून ताज हॉटेलमधून वाटप केली जायची. परंतु सलग दुसऱ्यांदा ‘टाटा’ने ही जेवणाची पाकिटे पुरवणे बंद केल्यानंतर खासगी कॅटरर्स कडून दोन वेळचा नाश्ता आणि दोन वेळचे जेवण पुरवण्याचे कंत्राट दिले. परंतु हे कंत्राट रद्द करून ताज हॉटेलकडून केवळ दोन वेळचे जेवण २९० रुपायांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला असून पुढील ७ ऑगस्ट पासून जेवण पुरवण्याचे कंत्राट देऊन महापलिका ताज हॉटेलच्या तिजोरीत काही भर टाकून उपकाराचे पांग फेडणार आहे.

कोविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केईएम,  शीव, नायर आणि कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टर व रुग्णालयीन कर्मचारी यांच्यासाठी ताज रुग्णालयाकडून जेवणाची व्यवस्था करण्यात येत होती. परंतु २३ मे पासून ही व्यवस्था पुरविण्यास ताज हॉटेलने असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे महापालिकेने तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथील जुन्याच कॅटरर्सवर जबाबदारी सोपवली. त्यानुसार त्यांनी कामाला सुरुवात करून सहा दिवस जेवण व नाश्ताची व्यवस्था केल्यानंतर, ताज ने अजून एक महिना जेवण पुरवण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार त्यांचे काम काढून पुन्हा ताजच्या माध्यमातून जेवण पुरविण्यास सुरुवात झाली. पण २६ जुलैला ताज ने पुन्हा जेवण पुरविण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर येथीलच त्या जुनाच कॅटरर्सला पुन्हा जेवण आणि नाश्ता पुरवण्याचे कंत्राट बहाल केले.

- Advertisement -

ताजने सुरुवातीला मोफत जेवणाची पाकिटे आपल्या रुग्णालयात वाटली होती. त्यामुळे त्यांना मागील महिन्यात दुपारचे जेवण १५० रुपये व रात्रीचे जेवण १४० रुपये याप्रमाणे दोन वेळच्या जेवणासाठी २९० रुपयांमध्ये दर निश्चित करून दिली. तर त्यातुलनेत सकाळ व संध्याकाळचा नाश्ता तसेच दोन्ही वेळचे जेवण हे ३०० रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले जात आहे. परंतु आजवर ताज ने महापालिकेला जे सहकार्य केले आहे, त्यामुळे पुढील जेवण पुरवण्याचे काम हे ताजलाच दिले जावे असा आग्रह महापलिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी धरत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि वैदयकीय महाविद्यालय व प्रमुख रुग्णालयांचे  संचालक डॉ. रमेश भारमल यांना निर्देश दिले. त्यानुसार आता पर्यंत जी संस्था सेवाभावी वृत्तीने डॉक्टर व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना जेवणाची पाकिटे पुरवत होते. तीच संस्था आता त्याच जेवणाच्या पाकिटांकरता महापालिकेकडून पैसे वसूल करणार आहेत.

महापलिका आयुक्तांच्या निर्देशांनुसार, येत्या ६ ऑगस्ट पासून चार रुग्णालयात जेवणाची  सुमारे पाच हजार पाकिटे पुरवण्याचे कंत्राट ‘ताज’ दिले जाणार आहे.  काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ताजच्या जेवणात दही, एक फळ आणि दालखिचडी असे पदार्थ असतात. त्यात नाश्ता नसतो.त्यातुलनेत मागील काही दिवसांकरता जे जेवण पुरवले जात आहे, त्यात दोन भाजी, चपाती, डाळ भात आणि एक गोड पदार्थ असतो.शिवाय दोन्ही वेळचा नाश्ताही दिला जातो. ‘ताज’ने नाव असले तरी सुरुवातीला त्याचे कुतूहल होतेच. शिवाय त्यावेळी काहीच पर्याय नसल्याने सर्व खात होते. पण आता सर्व सुरळीत होत असून ‘ताज’चे जेवण आता नकोसे वाटू लागले आहे.  मात्र, आयुक्तांना, उपकाराची परतफेड करायची असल्याने ते ताज हॉटेलचाच आग्रह धरत आहे. विशेष म्हणजे ‘ताज’च्या तुलनेत येथील सध्याचा नवीन कॅटरर्स हा दोन्ही वेळचा नाश्ताही देत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -