घरताज्या घडामोडीBMC Budget 2020: बेस्टचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी १५०० कोटींचे अनुदान

BMC Budget 2020: बेस्टचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी १५०० कोटींचे अनुदान

Subscribe

बेस्ट उपक्रमावरील सध्याच्या आर्थिक संकटावर मात करण्याच्या दृष्टीने आणि बस वाहतूक प्रणालीत सुधारणा करण्यासाठी महापालिकेने बेस्ट उपक्रमाला चालू आर्थिक वर्षात २९४१.३० कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. मात्र, बेस्टला या खर्चाचा लेखाजोखा दिलेला नसतानाच उपक्रमाला आणखी १५०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. पुढील वर्षाच्या अनुदानासाठी १५०० कोटी रुपयांएवढी तरतूद केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने देण्यात येणार्‍या १५०० अनुदानाच्या रकमेतील निधी हा कर्जाची परतफेड करण्यासाठी, भाडेतत्वावरील नवीन बसेस घेण्यासाठी तसेच वेतन करारामुळे येणारा आर्थिक बोजा आणि दैनंदिन खर्च आदी भागवण्यासाठी दिला जाणार आहे. बेस्टचे आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी मध्य वैतरणा धरणावरील पाण्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण होणार्‍या २५ मेगावॅट इतकी वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता मिळाली असल्याचे आयुक्तांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -