घरताज्या घडामोडीBMC Budget 2020: सतत अपघात होणाऱ्या रस्त्यांचा ठिकाणी होणार सुधारणा

BMC Budget 2020: सतत अपघात होणाऱ्या रस्त्यांचा ठिकाणी होणार सुधारणा

Subscribe

रस्त्यावरील काही विशिष्ट ठिकाणी सातत्याने अपघात असलेल्या प्रवण क्षेत्रांच्या रस्त्यांची जागतिक सल्लागारांच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये एकूण ३९ अपघात प्रवण क्षेत्र आढळून आली असून त्यापैकी १७ ठिकाणे ही महापालिकेच्या रस्त्यांवर आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर सुरक्षा उपायोजना अंमलात आणण्यासाठी स्वारस्य अर्ज रस्ते सुरक्षा परिक्षकांची नियुक्ती करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले. मुंबई महापालिकेच्यावतीने आगामी वर्षात २८९ किमी रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. यामध्ये २६६ सिमेंट काँक्रीट आणि २३ किमी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.

पेडिस्ट्रीयन फर्स्ट अशी संकल्पना मागील आयुक्तांनी मांडत त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु नवीन आयुक्तांनी पदपथांच्या सुधारणेसाठी केवळ ५० कोटी रुपयांचीच तरतूद केली आहे. पेव्हरब्लॉक ऐवजी स्टेन्सिल काँक्रिट, मार्बल चिप्ससह सिमेंट काँक्रिट यांचा वापर करून पदपथांची सुधारण करण्यात येतात. यावर्षी मेसर्स ब्लूमबर्ग फिलॉन्थॉपिस यांच्या सहयोगाने १९ संगमस्थानांची अर्थात चौकांची सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच एस.व्ही, रोड, नेपियन्सी रोड, विक्रोळी पार्क साईड नंबर १७, मौलाना शौकत अली रोड आणि राजा राममोहन रॉय रोड या रस्त्यांसाठी डब्ल्यू आर आयच्या यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या स्ट्रीट लॅब स्पर्धेतील नाविन्यपूर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

कोस्टल रोडसाठी २००० कोटींची तरतूद

सागरी किनारा प्रकल्पाचे काम २०१८ मध्ये सुरु करण्यात आले असून सध्या छोटी चौपाटी, प्रियदर्शनी पार्क, अमरसन्स गार्डन, हाजी अली जंक्शन आणि वरळी सी फेस येथील कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे पुढील चार वर्षांमध्ये पूर्ण होतील. यावर्षी या प्रकल्पासाठी २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी ३०० कोटींची तरतूद

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम चार टप्प्यात हाती घेण्यात आली असून पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील काम सन २०२१ मध्ये पूर्ण होईल. तर तिसर्‍या टप्प्यातील कामे ऑक्टोबर २०२० पासून सुरु होईल आणि चौथ्या टप्प्यातील कामांच्या निविदा मागवण्यात येत आहे. यासाठी सर्व प्रकल्पासाठी आगामी अर्थसंकल्पात ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -