…आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यालाही मिळाला पोलिसांचा प्रसाद

ओळखपत्र नसल्याने महापालिकेच्या सफाई खात्यातील कामगाराला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai
bmc worker bitten by police due to identity is not available
महापालिकेच्या कर्मचाऱ्याला मिळाला पोलिसांचा प्रसाद

अत्यावश्यक सेवा वगळता कुणीही रस्त्यावर फिरु नये, असे आवाहन केले जात असतानाही अनेकजण रस्त्यावर फिरकत असल्याने त्यांना पोलिसांचा प्रसाद मिळत आहे. मात्र, असाच प्रसाद अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सफाई खात्यातील कामगारालाही मिळाला आहे. आपल्या कर्तव्यावर निघालेल्या या कामगाराला नालासोपारा एस.टी.डेपो परिसरात पोलिसांनी मारहाण केली आहे. आपण महापालिकेच्या सफाई खात्यातील कामगार असल्याने कामावर निघाल्याचे सांगूनही पोलिसांनी त्याला फटकावले. परंतु, या कामगाराकडे ओळखपत्र नसल्याने तसेच ते न दाखवल्यामुळेच त्याला मारहाण झाल्याचे बोलले जात आहे.

कर्मचाऱ्याला पोलिसांची मारहाण

महापालिकेच्या जी-दक्षिण विभागातील कार्यालयात मोटार लोडर या पदावर कार्यरत असलेल्या नितीन सोमा गोहिल हे नालासोपारा येथे राहत आहे. सफाई खाते अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे त्यांना सेवेत रुजू राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी ते आपल्या कर्तव्यावर निघालेले असतानाच नालासोपारा येथून एस.टी.बस आगार परिसरात आक्रमक झालेल्या पोलिसांनी त्यांनाही चोप दिला. यामध्ये गोहिल यांचा डाव्या पायाला प्रचंड दुखापत झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अशाप्रकारे मारहाण करण्याचा प्रकाराचा तीव्र निषेध केला जात आहे.

पोलिसांनी मारहाण करण्याचा प्रयत्न करताच नितीन गोहिल यांनी ओळखपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला, असे त्याचे सहकारी सांगतात. परंतु, पोलीस आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र, त्याच्याकडे ओळखपत्र नसल्याने तसेच त्याने न दाखवल्यामुळेच त्याला मारहाण झाल्याचे म्हटले आहे. एस.टीमधून अत्यावश्यक सेवा वगळता खासगी कंपनींच्या लोकांनी जाण्यास गर्दी केल्यामुळेच हा प्रकार घडला होता, असेही बोलले जात आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जर त्यांच्याकडे ओळखपत्र नसेल किंवा हरवले असेल तर त्यांनी सहकाऱ्यांना सांगून तसेच ओळखपत्र बनवून घ्यायला हवे. मुंबईच्या रस्त्यांवर अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवेश नाही. त्यामुळे प्रत्येक कामगारांना आपल्याकडे ओळखपत्र बागळून पोलिसांनाही सहकार्य करावे, असेही आवाहन महापालिकेच्या सफाई खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.


हेही वाचा – उज्जवला योजनेंतर्गत महिलांना ३ महिन्यांपर्यंत मिळणार मोफत LPG गॅस


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here