‘1916’ हेल्पलाईन ठरतेय हेल्प’फूल’; डॉक्टर २४ तास ऑनड्युटी

Mumbai
bmc intern doctors working round the clock
हेल्पलाईनसाठी काम करणारे डॉक्टर्स

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये बरेच समज गैरसमज आहेत. साधी सर्दी, खोकला, घसा दुखी अशा समस्या जरी जाणवू लागल्या तरी लोक करोना असल्याच्या नजरेने पाहू लागलेत. त्यामुळे, राज्य सरकारतर्फे १९१६ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. ज्या लोकांना करोनाच्या लक्षणांबाबत शंका आहे त्यांच्यासाठी ही हेल्पलाईन गेल्या काही दिवसांपासून फायदेशीर ठरत आहे. करोनाचे युद्ध सुरु झाले असून उपचार कार्यात प्रामुख्याने डॉक्टरच‌ दिसून येत आहेत. पण, त्यासोबत घरी क्वारंटाईन केलेले तसेच करोना बद्दल शंका असणाऱ्यांना १९१६ या देण्यात आलेल्या हेल्पलाईनही डॉक्टरांची टीम हाताळतेय. या हेल्पलाईनवर दिवसाला किमान ८०० फोन येत असल्याचे ही हेल्पलाईन हाताळणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. शिवाय, आतापर्यंत १५ हजारांहून अधिक कॉल्सला डॉक्टरांच्या टीमने प्रतिसाद दिला आहे.

नायर हॉस्पिटलमधील विशेष आरोग्य अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल राख यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या हेल्पलाईनवर सर्व प्रकारची माहिती कॉल करणाऱ्या व्यक्तीला दिली जात आहे. हातावर स्टँप असलेल्यांना फोनवरुन विचारणा करण्यात येत आहे. प्रत्येक दुसऱ्या दिवशी करोनाच्या लक्षणांची चौकशी हेल्पलाईनवरुन करण्यात येत‌ आहे. काही लोक करोनाची लक्षणे असल्याचे देखील सांगतात. अशा वेळेस त्यांना चाचण्यांचा सल्ला दिला जातो. आतापर्यंत अशा अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत. पण, त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह येतात. सध्या निवासी डॉक्टर्स आणि इंटर्न्स ही हेल्पलाईन हाताळत आहेत.”

प्रत्येक दुसऱ्या मिनिटाला होतेय करोनाची चौकशी

हेल्पलाईनवर केलेल्या कॉल्सला प्रतिसाद देण्यासाठी एका टिममध्ये सध्या २२ डॉक्टर काम करत आहेत. यात १८ इंटर्न डॉक्टर्स आहेत. चार आरएमओ या टीमचे नेतृत्व करत आहेत. हे केंद्र नायर हॉस्पिटलमध्ये आहे. प्रत्येक दुसऱ्या मिनिटाला करोनाच्या चौकशीचे कॉल येत आहेत. लक्षणांची विचारणा करण्यात येतेच मात्र त्या सोबत कोव्हीड १९‌ आजाराची माहीती देण्यात येते. चौकशीतून संशयित रुग्णांला शोधण्याचे काम सुरु आहे. बुधवारी दिवसभरात १ हजार ४४९ कॉल्स होते. त्यानुसार, आतापर्यंत १५ हजारांहून अधिक कॉल्सची नोंद करण्यात आली आहे.

डॉक्टरांचे वर्क फ्रॉम होम

१९१६ या हेल्पलाईनवर सुरु असलेले काम सध्या वर्क फॉम होम पद्धतीने सुरू आहे. नायर हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांना एका हॉलमध्ये याबाबतची सोय करण्यात आली आहे. या कामासाठी डॉक्टरांना लॉग इन आयडी देण्यात‌ आली आहे. या हेल्पलाईनचे काम सध्या तीन शिफ्टमध्ये सुरू आहे. सकाळी ८ ते २, दुपारी २ ते ८ त्यानंतर रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत रोज ही हेल्पलाईन सुरू असते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here