घरमुंबईबोईसरचे आमदार विलास तरे शिवसेनेत

बोईसरचे आमदार विलास तरे शिवसेनेत

Subscribe

बहुजन विकास आघाडीला खिंडार

बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार विलास तरे यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे आणि सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. तरे यांच्या पक्षप्रवेशामुळे हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या तरे यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश करून 2009 साली बोईसरमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर झालेल्या 2014 च्या निवडणुकीतही तरे यांनी आपला गड राखला होता. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून तरे आघाडीपासून दुरावले होते. त्यातच मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या राजेंद्र गावीत यांनी बोईसर विधानसभा मतदारसंघात 38 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती.

- Advertisement -

ठाकूरांशी दुरावा झालेल्या तरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे तरे भाजपच्या वाटेवर आहेत अशीच कुणकुण होती. पण, लोकसभा निवडणुकीनंतर बोईसर मतदारसंघासह राज्यातील राजकीय समिकरणे बदलल्याचे लक्षात आल्यानंतर तरे यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. बोईसर मतदारसंघातील आघाडी पाहून शिवसेना आता या मतदारसंघावर दावा ठोकणार आहे. तर मुख्यमंत्र्यांकडूनही शिवसेनेत प्रवेश घेण्याबाबत हिरवा कंदील मिळाल्यानंतरच तरे यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतल्याचेही त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

तरे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली आहे. प्रारंभी ते सेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यामुळे याभागात त्यांची मजबूत पकड आहे. तरे यांच्या सेना प्रवेशाने हितेंद्र ठाकूर यांच्या साम्राज्याला मोठा हादरा बसला आहे. ठाकूरांपासून दुरावलेला पहिला नेता म्हणून तरे यांच्याकडे पाहिले जाते. ठाकूरांवर नाराजी असली तरी बंडखोरी करण्याची हिंमत आतापर्यंत कुठल्याही नेत्याने दाखवलेली नाही. त्यामुळे तरे यांच्या बंडखोरीचे दुरगामी परिणामी बहुजन विकास आघाडीसह पालघरच्या राजकारणात पहायवास मिळतील अशी चर्चा आहे.

- Advertisement -

दरम्यान, तरे शिवसेनेत आल्याने बोईसरमधून त्यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता आहे. दुसरीकडे, शिवसेनेतून कमलाकर दळवी, जगदीश धोडी आणि विश्वास वळवी इच्छुक आहेत. आमदार विलास तरेंच्या पक्ष प्रवेशामुळे इच्छुकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

कोणी कुठल्या पक्षात जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यात मी काय बोलू. देव त्यांचे भले करो.
-आमदार हितेंद्र ठाकूर, नेते, बहुजन विकास आघाडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -