Bollywood Drugs Connection: अर्जुन रामपालची NCB कडून ७ तास चौकशी

अभिनेता अर्जुन रामपाल
बॉलिवूड आणि ड्रग्जचे कनेक्शन शोधून काढण्यात एनसीबीचे अधिकारी चांगलेच कामाला लागलेले आहेत. आज बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची ७ तास चौकशी करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच अर्जुनच्या बंगल्यावर छापा टाकून सर्च ऑपरेशन राबविण्यात आले होते. त्यानंतर एनसीबीने अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला मेट्रियड्सची दोन दिवस कसून चौकशी केली. त्यानंतर आज अर्जुन रामपालची ७ तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना रामपाल म्हणाला की, “मी चौकशीला पुर्ण सहकार्य करत आहे. माझे ड्रग्जशी काही देणे घेणे नाही. माझ्या घरी सापडलेली औषधे आणि त्याचे प्रिस्क्रीप्शन एएनसीबीच्या अधिकार्‍यांना सुपुर्द करण्यात आले आहे.”
एनसीबीने आतापर्यंत दीपिका पदुकोण, रकुल प्रित सिंग, सारा अली खान यांची चौकशी केली आहे. त्यानंतर अर्जुन रामपाल हे मोठे नाव चौकशीतून समोर आले.

दुसरीकडे एनसीबीने ऑस्ट्रेलियन वंशाच्या वास्तूसजावटकार पॉल बार्टल याला सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. ड्रग्ज सप्लायर पॉल बार्टल हा Agisialos Demetriades (अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचा भाऊ) आणि रामपालचा मित्र असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बार्टल आणि रामपालची समोरासमोर पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.