घरताज्या घडामोडीयामुळे वांद्रे कोर्टाने कंगना विरोधात FIR दाखल करण्याचे मुंबई पोलिसांना दिले आदेश

यामुळे वांद्रे कोर्टाने कंगना विरोधात FIR दाखल करण्याचे मुंबई पोलिसांना दिले आदेश

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. वांद्र कोर्टाने अभिनेत्री कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करा, असे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. कंगनावर बॉलिवूडमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे वांद्र कोर्टाने मुंबई पोलिसांना कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

महोम्मद साहिल अशरफ अली सैय नावाची व्यक्ती कंगना विरोधात वांद्र कोर्टात गेली होती. त्या व्यक्तीने कंगनावर असे आरोप केले की, ‘कंगना सोशल मीडिया माध्यमातून शेअर करत असलेल्या पोस्ट किंवा व्हिडिओमधून बॉलिवूडमध्ये हिंदू आणि मुस्लिम असे दोन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये भांडणं लावण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे.’ यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या व्यक्तीने कोर्टात जाऊन केली आहे. तसेच या व्यक्तीने कोर्टासमोर कंगनाचे सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि ट्विट्स देखील सादर केले होते. या सर्व गोष्टींचा तपास करून वांद्रे कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर कंगनाची चौकशी होण्याची शक्यता असून तिच्या विरोधात पुरावे मिळाले तर कंगनाला अटक होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान वांद्रे कोर्टाचे आदेश असल्यामुळे मुंबई पोलिसांना कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल करून घ्यावा लागेल, असे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह एका मराठी वृत्तवाहिनीशी बातचित करताना म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – विक्रोळी पुलाजवळ बेस्टच्या मिनी बसचा अपघात, १० ते १५ प्रवासी जखमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -