घरमुंबईसेक्स रॅकेटप्रकरणी पुन्हा बॉलीवूड कनेक्शन उघडकीस

सेक्स रॅकेटप्रकरणी पुन्हा बॉलीवूड कनेक्शन उघडकीस

Subscribe

मुंबई शहरात छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश करण्याचा धडाकाच सुरु केला आहे. अंधेरीतील एका कारवाईत सेक्स रॅकेटप्रकरणी पुन्हा बॉलीवूड कनेक्शन उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका प्रोडेक्शन मॅनेजरसह कास्टिंग डायरेक्टरला समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. नावेद शरीफ अहमद अख्तर आणि नाविद सादिक सयद अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

नावेद आणि नाबीद हे दोघेही बॉलीवूडशी संबंधित असून यातील नावेद हा प्रोडेक्शन मॅनेजर तर नाबीद हा कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करतात. ते दोघेही मॉडेल आणि विदेशी तरुणींच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवितात. या मॉडेल आणि विदेशी तरुणींना मालिकासह चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून त्यांनी सेक्स रॅकेटमध्ये आणले होते. ही माहिती मिळताच समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍यांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने त्याची शहानिशा सुरु केली होती. या ग्राहकाच्या सांगण्यावरुन ते दोघेही सोमवारी तीन तरुणींना घेऊन अंधेरीतील एका नामांकित हॉटेलमध्ये आले होते. यावेळी पैशांचा व्यवहार सुरु असताना पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

- Advertisement -

या कारवाईत पोलिसांनी एका मॉडेलसह दोन विदेशी तरुणींची सुटका केली. या दोघीही तुर्केमेनिस्तानच्या रहिवाशी असून स्टुइंट व्हिसावर भारतात शिक्षणासाठी आल्या होत्या. सध्या त्या पुण्यातील एका महाविद्यालयात कला शाखेत शिकत आहेत. या दोघींना त्यांनी चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून झटपट पैशांसाठी सेक्स रॅकेटमध्ये आणले होते. मॉडेलच्या चौकशीत तिला अंधेरीतील एका महिलेने पाठविल्याचे सांगितले. ही महिला अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहत असून तिथेच तिच्या मालकीचा एक फ्लॅट आहे. मोबाईलवरुन ती वेश्यागनामासाठी मॉडेल तरुणींना पाठवित असल्याचे उघडकीस आले. तिला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. 3 जानेवारीला समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍यांनी जुहू येथील एका हॉटेलमध्ये कारवाई करुन दोन विदेशी तरुणींची सुटका केली होती.

याप्रकरणी कास्टिंग डायरेक्टर राजेशकुमार कामेश्वर लाल याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 14 जानेवारीला पोलिसांनी अंधेरीतील वर्सोवा परिसरात कारवाई करुन दोन मॉडेलची सुटका केली होती. त्यात एक ज्युनिअर कलाकार तर दुसरी मेकअप कलाकार होती.याप्रकरणी कास्टिंग डायरेक्टर नवीनकुमार प्रेमलाल आर्या याला पोलिसांनी अटक केली होती.

- Advertisement -

तिसर्‍या कारवाईत 16 जानेवारीला पोलिसांनी अंधेरीतील अन्य एका हॉटेलमध्ये कारवाई केली होती. या कारवाईत एका महिलेस अटक करुन तिच्या तावडीतून एका अल्पवयीन मुलीसह तीन तरुणींची सुटका केली ोती. यातील एका तरुणीने मराठी मालिकेत, दुसरीने सावधान इंडिया तर तिसरीने एका वेबसिरीजमध्ये काम केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानंतर चालू महिन्यांतील ही चवथी कारवाई आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -