Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी प्रसिद्ध मुच्छड पानवालाला NCBकडून समन्स

प्रसिद्ध मुच्छड पानवालाला NCBकडून समन्स

बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनप्रकरणी प्रसिद्ध मुच्छड पानवालाला समन्स पाठवण्यात आला आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनप्रकरणी प्रसिद्ध मुच्छड पानवालाला समन्स पाठवण्यात आला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, मुच्छड पानवालाला अटक करण्यात आलेल्या राहिला फर्निचरवाला हिच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मुच्छड पानवालाला समन्स पाठवला आहे. मुंबईतील केम्स कॉर्नरवर मुच्छड पानवाल्याचे पानाचे दुकान आहे.

अतिशय महाग गांजा जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने शनिवारी एका ब्रिटिश नागरिकासह तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या तिघांची चौकशी केली असता ब्रिटिश नागरिक करण सजनानीसह दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिणी शाईस्ता फर्निचरवाला यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ब्रिटिश नागरिक करण सजनानीला एनसीबीने वांद्र्यातून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अमेरिकेतून मागवण्यात आलेले ड्रग्स जप्त केले आहेत. हे अतिशय महाग आणि खास प्रकारचा गांजा असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोमल रामपाललाही समन्स

- Advertisement -

तर दुसरीकडे अभिनेता अर्जुन रामपाल याची बहिण कोमल रामपाललाही एनसीबीने पुन्हा एकदा समन्स पाठवला आहे. तिला आज चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वीही कोमलला समन्स पाठवण्यात आला होता. मात्र, ती चौकशीसाठी हजर न झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -