घरमुंबईव्हॅनिटी व्हॅन मालकांनी पुकारला संप

व्हॅनिटी व्हॅन मालकांनी पुकारला संप

Subscribe

महाराष्ट्र सरकारकडून मिळणाऱ्या अन्यायपूर्ण वागणुकीचा निषेध म्हणून येत्या १० डिसेंबरपासून बेमुदत असहकार आंदोलन करण्याचा इशारा बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कलाकारांना सेवा पुरविणारऱ्या "ऑल कॅम्पर व्हॅन ओनर्स असोसिएशन"ने जाहीर केला आहे.

महाराष्ट्र सरकारकडून मिळणाऱ्या अन्यायपूर्ण वागणुकीचा निषेध म्हणून येत्या १० डिसेंबरपासून बेमुदत असहकार आंदोलन करण्याचा इशारा बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कलाकारांना सेवा पुरविणारऱ्या “ऑल कॅम्पर व्हॅन ओनर्स असोसिएशन”ने जाहीर केला आहे. सध्या असलेल्या चित्रीकरणाला या आंदोलनाचा मोठा फटका बसेल, तसेच आघाडीच्या कलाकारांची मोठी गैरसोय होईल आणि शिवाय सहा हजाराहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारही धोक्यात येतील. व्हॅनिटी व्हॅनवर महाराष्ट्र सरकारने ५ हजार रुपये प्रति चौरस मीटर एवढ्या चढ्या दराने लावला असून त्याचा वार्षिक बोजा १ लाख २५ हजार रुपये एवढा येत असल्यामुळे व्हॅन मालक नाराज आहेत.

एक देश एक कर, अशा घोषणा सरकार देत असते परंतु वस्तुस्थिती मात्र तशी नाही. भारतात कोठेही व्हॅन वर क्षेत्रफळानुसार म्हणजे ‘प्रति चौरस मीटर” दराने कर आकारला जात नाही. असा कर आकारणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. इतर सर्व राज्यात व्हॅनिटी व्हॅन वर वार्षिक १० हजार ते १२ हजार रुपये कर आहे. काही राज्यांनी एक रकमी १ लाख रुपये कर आकारला आहे.
– केतन रावळ, अध्यक्ष, ऑल कँपर व्हॅन ओनर्स असोसिएशन

- Advertisement -

केंद्र सरकार च्या नव्या वाहन ४.० धोरणात व्हॅनिटी व्हॅन वर प्रतिवर्षी १२ हजार रुपये कर आहे, मात्र महाराष्ट्रात आरटीओ तो मान्य करत नाहीत. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात मध्ये दहा वर्षांसाठी ५७ हजार ७२५ रुपये कर आकारला जातो. दिल्लीत हा कर गाडीच्या वजनानुसार ठरतो तर तेलंगण मध्ये प्रतिवर्षी १२ हजार रुपये कर आहे. राजस्थान आणि त्रिपुरा येथे अनुक्रमे १२ हजार रुपये इतकी तर एक रकमी ६८ हजार १७५ रुपये आहे.

“महाराष्ट्रातल्या या भरमसाठ करामुळे आम्हाला व्यवसाय बंद करण्याची पाळी आली आहे,” असे रावळ म्हणाले. “भरीत भर म्हणून यावर्षी फेब्रुवारीपासून सेवा कर विभागानेही व्हॅनिटी व्हॅन मालकांना जास्तीचा सेवा कर भरण्यासाठी तगादा लावला आहे. आता तर अनेकांना वरिष्ठ अधिकारी अजित सावंत यांची समन्स आली आहेत,” असे रावळ म्हणाले.

- Advertisement -

विभागीय वाहतूक अधिका-यांनी आम्हाला ‘रेंट या कॅब’ या श्रेणीतील परवाना दिला आहे आणि सेवा कर विभागाने रेंट अ कॅब व्यवसायाला लागू असलेला सेवा कर आम्हाला लागू असल्याचे पत्रही दिले आहे. मात्र श्री अजित सावंत यांनी ते अमान्य करून आम्हाला गेल्या पाच वर्षांच्या काळासाठी १४ टक्के सेवा कर देण्याबद्दल आमची छळणूक सुरु केली आहे. कर न भरल्यास आमची वाहने सील करण्याचा तसेच बँकेतील खाती आणि आमची मालमत्ता जप्त करण्याची धमकीही दिली आहे.
– आशुतोष देसाई, महासचिव, ऑल कॅम्पर व्हॅन ओनर्स असोसिएशन

या पार्श्वभूमीवर संघटनेने बेमुदत असहकार आंदोलन करण्याचा निर्धार केला असून त्यामुळे २५० व्हॅन मालक बेकार होतील तसेच या व्हॅन वर कामाला असलेले ५०० हून अधिक कामगार रोजगाराला मुकतील. या आंदोलनामुळे चित्रीकरण ठप्प होणार असल्यामुळे सुमारे ५ हजार रुपये रोजंदारीवर काम करणारे कामगार संकटात येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -