घरमनोरंजनKangana Ranaut Mumbai Office: उच्च न्यायालयानं २२ सप्टेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली

Kangana Ranaut Mumbai Office: उच्च न्यायालयानं २२ सप्टेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली

Subscribe

महानगरपालिकेने कंगनाचे ऑफिस तोडल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात झालेली सुनावणी २२ सप्टेंबरपर्यंत तहकूब

बृहन्मुंबई महानगरपालिकेने बुधवारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचे मुंबईतील ऑफिस तोडले. कंगनाच्या ऑफिसवर महापालिकेने तोडफोड केल्याप्रकरणासाठी मुंबई उच्च न्यायालयाने २२ सप्टेंबरची तारीख दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तिच्या ऑफिसची तोडफोड करण्यास बंदी घातली तेव्हा कंगनाला पालिकेविरूद्ध मोठा विजय मिळाला. तर या सुनावणीमध्ये पालिकेचे वकील म्हणाले की, कोर्टाच्या आदेशानंतर बीएमसीची सर्व कामे थांबविण्यात आली आहेत. तर कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी म्हणाले की, अनेक पुरावे रेकॉर्डवर आणण्याची गरज आहे. माझा क्लायंट नुकताच मुंबईत आला असल्याने मला फाईल तयार करण्यासाठी वेळ हवा आहे.

- Advertisement -

कोर्टाने सांगितले की, पालिकेची ही कारवाई प्राणघातक आणि अपमानजनक आहे. शिवसेनेबरोबर शाब्दिक युद्धाच्या दरम्यान कंगना मुंबईत परतली आहे. मात्र असा आरोप केला जात आहे की, कंगना शिवसेना विरूद्ध बोलत असल्याने दोघांत शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्यामुळे कंगनाला महाराष्ट्र सरकार लक्ष्य करत आहे. तर या प्रकरणातील कंगनाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती, परंतु ती आता २२ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

सुनावणी २२ सप्टेंबरपर्यंत तहकूब

महानगरपालिकेने कंगनाचे ऑफिस तोडल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीला २२ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. त्यामुळे २२ सप्टेंबरपर्यंत कोणतेही बांधकाम काम करता येणार नाही.

- Advertisement -

बुधवारी कंगनाच्या बाजूने सुनावणी करताना कोर्टाने काय म्हटले

मध्यरात्री अचानक, झोपेतून जागे झाले आणि शहरात नसताना याचिकाकर्त्याला नोटीस बजावली. यासह कंगनाला २४ तासांच्या आत उत्तर देण्यास सांगितले. लेखी विनंती करूनही, कंगनाला अधिक वेळ देण्यात आला नाही तर २४ तास संपताच कंगनाचे मुंबईतील ऑफिस तोडण्यात आले.


कंगना १४ दिवस होम क्वारंटाईन होणार नाही, BMC ने दिली सूट!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -