बूथ कार्यकर्त्यांना भाजप नेत्याकडून पैशांचे आमिष !

राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Mumbai
money
प्रातिनिधिक फोटो

ज्या बुथमधून विरोधी पक्षाला शून्य मतदान होईल त्या बूथ कार्यकर्त्यांना 11 हजार रुपये देण्याची वादग्रस्त घोषणा भाजप सभागृह नेता जमनू पुरुस्वानी उल्हासनगर मध्ये शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेत मंचावरून केली होती. याचा व्हिडीओ आणि लेखी निवेदन निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना सादर करून गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सचिवांना केली आहे. याबाबत जमनादास पुरसवानी यांनी ‘मी अशा प्रकारचे कोणतेही विधान केले नसल्याचे सांगून बोलण्यास नकार दिला’.

दहा एप्रिलच्या सायंकाळी उल्हासनगर कॅम्प 4 येथील मराठा विभागात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे, टिओके प्रमुख ओमी कलानी, सभागृह नेता जमनादास पुरसवानी, विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी, सुमित चक्रवर्ती आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभागृह नेता जमनादास पुरसवानी यांनी केलेल्या भाषणात ज्या बूथवर शून्य मतदान मिळेल त्या बूथ प्रमुखांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 11 हजार रुपयांचे रोख बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले.

या घोषणेची व्हिडिओ फीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण जिल्हा सचिव प्रसन्न अचलकर यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिली आहे. त्या बरोबर दिलेल्या लेखी निवेदनात बूथ कार्यकर्त्यांना 11 हजार रुपये देण्यासंबंधीचे आमिष दाखविल्याचे नमूद केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here