घरमुंबईपोलीस, तहसील कार्यालयाचा पाणीपुरवठा खंडित

पोलीस, तहसील कार्यालयाचा पाणीपुरवठा खंडित

Subscribe

 केडीएमसीकडून धडक कारवाई

पाणीपुरवठा थकबाकीदारांविरोधात पालिका प्रशासनाने धडक पावले उचलली असतानाच आता सरकारी कार्यालयाच्या थकबाकीविरोधातही प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली आहे. पोलीस तहसीलदार पंचायत समिती आणि टेलिफोन एक्सचेंज या सरकारी कार्यायाची पाणीपुरवठा थकबाकीप्रकरणी पालिकेने त्यांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. सरकारी कार्यालयाचा पाणीपुरवठा खंडित होण्याचा पालिकेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रकार आहे. सरकारी कार्यालयाच्या पाणीपट्टी थकबाकीकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे वृत्त ‘आपलं महानगर’ने  दिले होते.

पाणीपट्टीच्या वसुलीसाठी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी आढावा बैठक घेऊन पाणीपट्टी थकबाकीदारांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसह सरकारी कार्यालयावरही कारवाईची मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना आयुक्तांकडून मिळाल्यानंतर पालिकेचे पाणीपुरवठा विभाग चांगलेच कामाला लागले आहे. पाणीपट्टी थकबाकीदारांविरोधात पालिका प्रशासनाने कडक मोहीम राबवून त्यांच्या नळजोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरूच आहे. यंदाच्या वर्षी पाणी बिल वसुलीचे 75 कोटी रुपयांचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीत पाणी बिलाची 55 कोटी 15 लाख रुपये वसूल केले आहेत.  सामान्य नागरिकांबरोबरच आता पालिका प्रशासनाने सरकारी कार्यालयाकडे कारवाईचा बडगा उगारला आहे.

- Advertisement -

कल्याण शहरातील पोलीस कॉलनी, कल्याण तहसील कार्यालय,  पंचायत समिती, टेलिफोन एक्सचेंज या सरकारी कार्यालयाची लाखो रुपयांची थकबाकी असतानाही पालिकेकडून अनेक वर्षांपासून कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे थकबाकीची रक्कम कोटीच्या घरात गेली आहे. पालिका प्रशासनाकडून केवळ नोटीसा देण्याचेच काम केले जायचे. सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय व सरकारी कार्यालयांना दुसर न्याय असा प्रकार अनेक वर्षापासून सुरू होता. आपलं महानगरने याविषयी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पालिका आयुक्त बोडके यांनी सरकारी कार्यालयावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार  पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  पाणी विभागाच्या कर्मचार्‍यांनी  थकबाकीदार असलेल्या शासकीय कार्यालयांच्या नळजोडण्या खंडित केल्या आहेत.

कोणाची थकबाकी किती?

पोलीस कॉलनी, कल्याण – 8 कनेक्शन-( 1. 19 कोटी) , 2) पंचायत समिती कार्यालय : 1  कनेक्शन – (6.76 लाख),  3) तहसिलदार कार्यालय, कल्याण – 1 कनेक्शन – (6.31 लाख ), 4) टेलिफोन एक्सचेंज,कल्याण -7 कनेक्शन -1.60 लाख.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -