घरमुंबईपुलांचा प्रकल्प खर्च रेल्वेमुळे वाढणार

पुलांचा प्रकल्प खर्च रेल्वेमुळे वाढणार

Subscribe

मुंबईत रेल्वे मार्गावर सध्या ११ पुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी महापालिकेने महाराष्ट्र रेल इन्फ्रास्टक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या तज्ज्ञ संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या सल्लागार सेवेसाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ११ टक्के व्यवस्थापन शुल्क देण्यात येणार आहे. परंतु याबरोबरच सव्वा आठ टक्के देखभाल शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या हद्दीतील पुलांच्या कामांसाठी एकूण खर्चाच्या १९.२५ टक्के एवढी रक्कम खर्च होणार असल्याने महापालिकेच्या पुलांच्या खर्चाचा भार वाढणार आहे.

रेल्वे मार्गावरील पुलांचे बांधकाम करताना येत असल्याने अडचणींवर मात करून त्यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्क्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या तज्ज्ञ संस्थेकडून मदत घेण्याचा प्रस्ताव मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी दिला आहे. त्यानुसार मुंबईतील रेल्वेवरील पुलांच्या कामांसाठी या संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ६८ पुलांची कामे करण्यात येत असून त्यांच्या देखरेखीखाली ही कामे होत आहे. तसेच मुंबईतील ११ रेल्वे पूल आणि १ भुयारी वाहतूक मार्गाचे काम या संस्थेच्या देखरेखीखालीच होणार आहे. महाराष्ट् रेल इन्फ्रास्ट्क्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही संस्था महाराष्ट् शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम असून महाराष्ट् राज्यातील विविध प्रकल्पांच्या कामांची अंमलबजावणी त्यांच्यामार्फत होते.

- Advertisement -

या सर्व पुलांच्या कामांचा प्रकल्प खर्च हा महापालिकेच्या पूल विभागाच्या कॉस्ट सांकेताकानुासर भांडवली अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात येईल. कामांसाठी या संस्थेने प्रकल्प खर्चाच्या ११ टक्के एवढे व्यवस्थापन शुल्क अधिक रेल्वे प्रशासनाला रेल्वे हद्दीतील पुलांच्या कामांच्या प्रकल्प खर्चाच्या ८.२५ टक्के देखभाल शुल्क आकारण्यात येईल असे कळवले आहे.

रेल्वे लाईनवरील हाती घेण्यात आलेल्या पुलांची नावे

  • भायखळा रेल्वे लाईन पूल
  • ओलीवंट रेल्वे लाईन पूल
  • आर्थर रोड रेल्वे लाईन पूल,
  • गार्डन अर्थात एस ब्रिज रेल्वे लाईन पूल
  • रे रोड रेल्वे लाईनवरील पूल
  • करी रोड रेल्वे लाईनवरील पूल
  • बेलॉसिस रेल्वे लाईनवरील पूल
  • महालक्ष्मी स्टील रेल्वे लाईनवरील पूल
  • टिळक रेल्वे लाईनवरील पूल
  • डि.पी. रोडवरील मध्य रेल्वे ओलांडून जाणारा पूल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -