घरमुंबईगणेशोत्सव मंडळांनी सजावटीचा निधी पूरग्रस्तांना द्यावा - नरेश दहिबावकर

गणेशोत्सव मंडळांनी सजावटीचा निधी पूरग्रस्तांना द्यावा – नरेश दहिबावकर

Subscribe

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळाना समन्वय समितीने मदतीचे आवाहन केले आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळाना समन्वय समितीने मदतीचे आवाहन केले आहे. गणेशोत्सवात सजावटीवर खर्च न करता ते पैसे मंडळांनी पूरग्रस्तांना द्यावेत, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी केले आहे.

काय म्हणाले दहिबावकर

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात सध्या पुराचं संकट आहे. अशावेळी तेथील पूरग्रस्त बांधवांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यानुसार आम्ही मंडळांना आवाहन केले होते. ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’सह अनेक मोठमोठ्या मंडळांनी त्यास प्रतिसाद दिला आहे. याचा मला अभिमान वाटतो. याआधीही प्रत्येक आपत्तीच्या वेळी गणपती मंडळं पुढे आली होती. आताही सजावटीवरील अनावश्यक खर्च टाळून जास्तीत जास्त मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिली जाईल, असा विश्वास आहे, असे दहिबावकरांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कोल्हापूर, सांगलीत बचावकार्य सुरु 

गेल्या सहा दिवसांपासून सांगली आणि कोल्हापुरात पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नागरिक बेघर झाले असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. सर्व स्तरातून त्यांना मदत पोहोचवण्याचे काम सुरु आहे. कलाकार मंडळी, सामाजिक संस्था हे सगळेच आपापल्यापरीने साहित्या सामुग्री कोल्हापूर आणि सांगलीला पोहोचवत आहेत. राज्य सरकारचा आपत्कालीन विभाग, एनडीआरएफ यांचं बचावकार्य सुरू आहे. अशा वेळी येत्या गणेशोत्सवात मंडप सजावटीवर हजारो रुपये खर्च न करता सार्वजनिक मंडळांनी पूरग्रस्तांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरु होत आहे. नेहमीप्रमाणे यंदाही गणेश मंडळं त्यांच्या सजावटीसाटी भव्यदिव्य देखाव्याची तयारी करतील, यात शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -