घरमुंबईभिवंडीत सैराट! बहिणीच्या प्रियकराची भावांकडून हत्या

भिवंडीत सैराट! बहिणीच्या प्रियकराची भावांकडून हत्या

Subscribe

भिवंडीत बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध करीत दोघा भावांनी बहिणीच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बहिणी सोबत शेजारी राहणाऱ्या तरुणाशी असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध करीत दोघा भावांनी बहिणीच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या आईने केला आहे. मात्र, पोलिसांनी त्या दोन्ही भावांवर आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा केल्याने नारपोली पोलीस वादाच्या भोऱ्यात सापडले आहेत. खळबळजनक बाब म्हणजे प्रियकराच्या घरात घुसून त्याला बहिणी सोबत असलेले प्रेमसंबंध थांबव अन्यथा ठार मारीन अशी धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

भिवंडीतील अण्णाभाऊ साठे नगर परिसरात राहणारे चंदन उपेंद्र प्रसादगौड (२५) आणि कुंदन उपेंद्र प्रसादगौड (२५) या भावांची बहिणीचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अप्पा किशोर पाटील (२१) या तरुणाशी प्रेमसंबंध होते. या दोन्ही भावाने आपल्या बहिणीशी असलेले प्रेमसंबंध थांबव नाहीतर तुला ठार मारु अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर बहिणीचा प्रियकर अप्पा याचा मृतदेह एका आंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चंदन प्रसादगौड (२५) कुंदन प्रसादगौड (२५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केले आहे. तसेच या आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नोकरीचे आमिष दाखवून कोटींचा गंडा; दोन जणांना अटक


बहिणीच्या प्रियकराची भावांकडून हत्या

मिळालेल्या माहितीनुसार मृतक अप्पा हा आईं सुमन सोबत भिवंडीतील अण्णाभाऊ साठे नगर परिसरात राहायचा. तो व्यावसायाने रंगारी कंत्राटदार होता. काही महिन्यापासून याच परिसरात पाण्याच्या टाकी शेजारी रोहिदासनगर मध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीशी त्याचे प्रेम झाले. मात्र या दोघांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण तरुणीच्या घरच्यांना लागल्याने त्यांनी त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध केला. मात्र तरही दोघे लपूनछपून भेटत असल्याची माहिती भावांना मिळाली. या माहितीच्या आधारे दोन्ही भावांने अप्पाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. ८ जून रोजी सकाळी ६ वाजता हे दोघेही अप्पाच्या घरी जावून त्याला मोठा वाडा परिसरात घेऊन आले. तसेच त्याला आपल्या बहिणीशी असलेले प्रेमसंबंध तोड नाही तर तुला ठार मारून टाकू अशी धमकी देखील दिली. यामुळे सकाळी साडे तास वाजता नैराश्यातून अप्पाने अण्णाभाऊ साठेनगरच्या मागे मोठा वाडा मधील एका आंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचा गुन्हा नारपोली पोलिसांनी दाखल केला.

- Advertisement -

आत्महत्या नसून हत्या

दरम्यान, मृतकची आई सुमन (४५) यांनी मात्र माझ्या मुलाची गळा दाबून त्या दोघा भावांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी चंदन आणि कुंदन या दोघा भावांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून दोन्ही भावांना अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लोंढे करीत आहेत.


हेही वाचा – 32 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी नायजेरीयन नागरिकाला अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -