घरमुंबईथकीत बिलामुळे बीएसएनलचा वीज पुरवठा बंदच

थकीत बिलामुळे बीएसएनलचा वीज पुरवठा बंदच

Subscribe

इंटरनेट बंद झाल्यामुळे बँका, टपाल, गॅस एजन्सी, एटीएम ठप्प

वीज पुरवठा खंडित केल्यामुळे बीएसएनएलची स्थिती अजूनही बिकट आहे. मागील आठवड्यापूर्वी राज्य विद्युत महामंडळाची थकीत वीज वीज देयक न भरल्याने महामंडळाने वीज पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे येथील चार बँका, डाक कार्यालय, एच.पी गॅस एजन्सी, सहकारी पतपेढ्या यांच्याबरोबरच आंबिवलीतील पूर्व, पश्चिम येथे असणार्‍या ए.टी.एम सेवा खंडित झाल्या आहेत.

सरकारला बीएसएनलकडून इंटरनेट सेवा पुरवली जाते. मात्र, त्यांचाच वीज पुरवठा मागील शुक्रवारपासून खंडित झाल्याने इंटरनेट सेवेअभावी सरकारी कार्यालयांत गोंधळ निर्माण झाला आहे. बीएसएनएलकडे राज्य विद्युत मंडळाच्या तीन लाखांची थकबाकी आहे. एन.आर.सी कॉलनीमध्ये बीएसएनएलचे विभागीय कार्यालय असून त्या ठिकाणी कार्यालयाचे जनरेटर आहे. मात्र, ते जनरेटरही नादुरुस्त झाल्याने बंद असल्याने इंटरनेट सेवा कोलमडली आहे. याठिकाणी कॅनरा बँकेच्या दोन शाखा, एक विजया बँक, एक स्टेट बँक तसेच डाक कार्यालय आणि किमान 10 एटीएम आहेत. त्याचबरोबर सहकारी पतपेढ्या आहेत. मात्र, बीएसएनलकडून या संस्थांची वीज पुरवठ्या अभावी इंटरनेट सेवा बंद आहे.

- Advertisement -

मोहने डाक कार्यालयातील कर्मचारी रोज आलेले टपाल बटवडा आणि त्यातच रजिस्टर, स्पीड पत्रे तसेच येणारे पार्सल शहाड येथील पोस्ट कार्यालयात स्कॅनिंगसाठी घेऊन जात असून त्यानंतरच त्याचे डाक ग्राहकांना वितरण केले जात आहे. अशीच अवस्था बँकांची झाली असून बँकांमधील सर्व व्यवहार इंटरनेट सेवेमुळे खंडित झाले असून पैसे काढण्यापासून तर भरण्यापर्यंत सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -