घरमुंबईराम मंदिराच्या आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा

राम मंदिराच्या आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा

Subscribe

विहिंपची शिवसेनेवर कडवट टीका

प्रतिनिधी:- अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या प्रश्नावर शिवसेनेने घेतलेला पुढाकार विश्व हिंदू परिषदेलाही रुचेनासा झाला आहे. आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभारा नंतर राममंदिराचा विचार करा, असे विहिंपने सेनेला सुनावले आहे. परिषदेच्या रुग्ण सेवा सदनाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विहिंपचे आंतरराष्ट्रीय माजी अध्यक्षन्या. विष्णू कोकजे यांनी सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यावर सडकून टीका केली. राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने आपल्या हाती घेतल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांचा पारा चढला आहे. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या विषयावर आंदोलनाची भाषा सुरू केली असताना आता विश्व हिंदू परिषदेने शिवसेनेच्या राम मंदिर मुद्याला विरोध केला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या रुग्ण सेवा सदनाच्या वर्धापनदिनात प्रमुख पाहुणे म्हणून कोकजे आले होते. 25 नोव्हेंबर रोजी शिवसेना अयोध्येत रॅली काढून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. परंतु रामजन्मभूमीचा मुद्दा इतक्या वर्षांनी त्यांना अचानक कसा काय आठवला हा प्रश्न मला पडला आहे. अयोध्येत शिवसेनेची किती ताकद आहे? मुंबईत परप्रांतीयांना झोडायचे आणि तिकडे(उत्तर भारतात) अयोध्येत जाऊन परप्रांतियांच्या मुद्यावर पापक्षालन करायचे उद्योग सेनेने सुरू केले असल्याची टीका त्यांनी केली.

शिवसेना राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करायचा प्रयत्न करत आहे. परंतु असा मुद्दा हायजॅक करण्याची ताकद सेनेकडे नाही. पत्रकार परिषदा घेऊन राम मंदिर उभारले जाणार नाही. शिवसेनेने आधी बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक बांधावे त्यानंतरच अयोध्येकडे लक्ष द्यावे, असा टोला कोकजे यांनी मारला.केंद्र सरकारने राम मंदिराबाबत तातडीने अध्यादेश काढायला हवा. न्यायालयाच्या निकालांची आणि प्रक्रियांची किती दिवस वाट पहाणार? अशी विचारणा कोकजे यांनी केली. शबरीमला मंदिराबाबतही कोकजे यांनी महिलांवर टीका केली. शबरीमलामध्ये प्रवेशासाठी ज्या महिला पत्रकार आणि अ‍ॅक्टीव्हीस्ट पुढाकार घेत आहेत, त्यांना शबरीमला मंदिर कुठे आहे, हेदेखील माहीत नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -