घरमुंबईमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारत कोसळली; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

मुंबईतील डोंगरीत चार मजली इमारत कोसळली; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Subscribe

मुंबईच्या डोंगरी भागात केसरबाई इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डोंगरीच्या बाबा गल्लीत चार मजली इमारत कोसळली आहे. इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटानास्थळी दाखल झाले आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक प्रयत्न करत होते. यानंतर अग्निशमन दलाचे आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे.

मृत व्यक्तींची यादी

साबिया नसीर शेख – वय वर्ष ६०

- Advertisement -

अब्दुल कालु शेख – वय वर्ष ५५

मुझामिल मनसूर सलमानी – वय वर्ष १५

- Advertisement -

सायरा रिहान शेख – वय वर्ष २०

जखमी व्यक्तींची यादी

फिरोज सलमाना – वय वर्ष ४५

झीनत रहेमान – वय वर्ष ३०

आयेशा शेख – वय वर्ष ४

अब्दुल रेहमान – वय वर्ष ३

नावेद सलमान – वय वर्ष ३०

इम्रान हुसेन कलवानी – वय वर्ष ३०

सलमान अब्दुल शेख – वय वर्ष ४५

जावेद इस्माईल – वय वर्ष ३४

अनोळखी – वय वर्ष ३

ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकल्याची शक्यता

या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार १५ कुटुंब या इमारतीत वास्चतव्याला आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक मदतीसाठी किंचाळत आहेत. त्यांच्या ओरडण्याचा मोठा आवाज व्हिडिओत येत आहे.

मुंबईतील डोंगरी परिसरात पुन्हा एकदा कोसळली इमारत

डोंगरी येथे चार मजली इमारत कोसळली

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜುಲೈ 15, 2019


हेही वाचा – सरकार आता मृतांना पाच लाख देणार, पण दुर्घटना कशा रोखणार? – वारिस पठाण

हेही वाचा – मुंबईतील डोंगरीत इमारत कोसळली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -