घरमुंबईवसईत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

वसईत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

Subscribe

वसई विरार महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरु केली आहे. मंगळवार आणि बुधवारी सलग दोन दिवस पेल्हार प्रभाग समितीच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. सहाय्यक आयुक्त राजेश घरत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

महापालिकेला कायमस्वरुपी आयुक्त नसल्याने अनधिकृत बांधकामांचा वेगही वाढल्याचे पहावयास मिळते. शहरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुुरु असून महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. गेल्या काही महिन्यात महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर मोठी कारवाई झालेली दिसून आलेली नाही. मात्र, मंगळवार आणि बुधवारी पेल्हार प्रभाग समितीच्या उमर कंपाऊंडमधील तब्बल नऊ पत्राशेडवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने कारवाई केली. या कारवाईत 25 हजार फूटांहून अधिक मोठाले शेड जमीनदोस्त करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -