घरमुंबईमुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, १० प्रवासी जखमी

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, १० प्रवासी जखमी

Subscribe

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सुरूच आहे. आज रविवारी पहाटे एका खाजगी बसचा ब्रेक फेल झाल्याने बसने समोरोल ट्रकला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. बस आणि ट्रकच्या या भीषण अपघातात बसमधील 10 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसमध्ये एकुण 49 प्रवाशी प्रवास करत होते.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून भरधाव वेगात मुबंई कडे ही बस जात असताना तिचा ब्रेक फेल होऊन चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघता झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे या बसने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात बस मधील 10 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी पवना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणितीही जीवित हानी झाली नाही. या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी पेट्रोलिग, अपघात ग्रस्त टीमचे सदस्य हे तात्काळ घटनास्थळी दाखल होत बस मधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढुन त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवुन दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -