घरमुंबईभायखळ्यातून ४६ लाख जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

भायखळ्यातून ४६ लाख जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

Subscribe

भायखळ्याच्या भगवा महल, बी.जे.मार्ग, सात रस्ता परिसरात कारची तपासणी करण्यात आली. कार मालकाची चौकशी सुरू आहे.

लोकसभा निवडणूकीसाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच मुंबईतल्या भायखळा भागातून लाखो रुपये जप्त करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाने ४६ लाख २१ हजार रुपये जप्त केले आहेत.

बुधवारी संध्याकाळी ६ वाजता भायखळा येथे निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाई केली. भायखळ्याच्या भगवा महल, बी.जे.मार्ग, सात रस्ता परिसरात कारची तपासणी करण्यात आली. या कारमध्ये ४६ लाख २१ हजार रुपये आढळून आले. ही रक्कम या पथकाने जप्त केली आहे. भायखळा विधानसभा मतदारसंघातील युवराज पाटील यांच्या स्थिर तपासणी पथकाव्दारे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, ही कार ईश्वर सोलंकी या व्यक्तीची आहे. याप्रकरणी आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. ही माहिती ३१ – मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. बन्सी गवळी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -