घरताज्या घडामोडीमुंडेची पाठराखण करत अब्दुल सत्तारांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंची 'ती' आठवण

मुंडेची पाठराखण करत अब्दुल सत्तारांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंची ‘ती’ आठवण

Subscribe

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हे प्रकरण बाहेर येताच एकाबाजूला भाजप नेत्यांनी धनंजय मुंडेवर टीकास्त्र सोडले असून त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला या अडचणीत शिवसेना धनंजय मुंडेंच्या मदतीला धावून आली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडेची पाठराखण करत ‘प्यार किया तो डरना क्या’, असे म्हणाले आहेत.

नक्की काय म्हणाले अब्दुल सत्तार?

अब्दुल सत्तार म्हणाले की, ‘धनंजय मुंडे आणि त्या महिलेचे संबंध काही लपून राहिलेले नाहीत. याबाबत त्यांनी स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली. तसेच दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची कबुलीही त्यांनी दिली.’ याच पार्श्वभूमीवर बोलताना अब्दुल सत्तार यांनी दिवंगत बाळासाहेबर ठाकरे यांची आठवण काढली. ते म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना ‘प्यार किया तो डरना क्या?’, असे म्हणाले होते.’

- Advertisement -

योग्य वेळ आल्यावर भाजप नेत्यांची नाव जाहीर करू – अब्दुल सत्तार

धनंजय मुंडे यांनी शपथ पत्रात माहिती लपवली असल्याचे आरोप करण्यात आले. यावर अब्दुल सत्तार म्हणाले की, ‘अनेक भाजपच्या नेत्यांचीही अशी निवडूक आयोगाकडे माहिती लपवली आहे. योग्य वेळ आल्यावर भाजपच्या त्या नेत्यांची नाव आणि पत्ते जाहीर करू’, असा इशारा सत्तार यांनी दिला.


हेही वाचा – प्रतिज्ञापत्रात ‘त्या’ मुलांचा उल्लेख न केल्याने धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणी वाढू शकतात – असीम सरोदे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -