घरट्रेंडिंगसावधान! 'ही' महिला तुमच्या शेजारी उभी राहते आणि करते असं काही...

सावधान! ‘ही’ महिला तुमच्या शेजारी उभी राहते आणि करते असं काही…

Subscribe

महानगरमध्ये चोरट्यांची काही कमी नाही. दररोज येथे चोरी, दरोडा, घरफोडीसारख्या घटना घडत असतात. मात्र दिवसा ढवळ्या, भर बाजारात, लोकांच्या गर्दीत चोरी करून शिताफीने निघून जाणारे चोर क्वचितच असतात. अशीच एक हुश्शार महिला चोर सध्या दक्षिण मुंबई परिसरात फिरत आहे. कोणत्याही दुकानात जाऊन शेजारील ग्राहकाची पर्स कोणाच्याही नकळत काढून घेऊन अगदी सहजपणे तिथून निघून जाणारी ही महिला या व्हिडिओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे ही महिला वयस्कर असल्याचे जाणवते. माटुंगा पोलिसांनी जारी केलेल्या या दोनही चोरीच्या व्हिडिओमध्ये पर्स चोरणारी ही एकच महिला असल्याचे दिसून येत आहे. शिवाय या दोनही चोऱ्या एकाच दिवशी झाल्याचे तिच्य गुलाबी रंगाच्या ड्रेसवरून समजले जात आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मेडिकल स्टोअर तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये जनरल स्टोअरमधून शेजारी उभ्या असलेल्या महिलांच्या मोठ्या बॅगेतून पर्स काढून घेतल्याचे दिसत आहे. हे दृष्य दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये टिपले असून ही चोरी करणारी महिला कोणाला दिसल्यास त्यांनी त्वरीत पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहनदेखील पोलिसांकडून केले जात आहे.

Video: 'या' ज्येष्ठ महिलेपासून सावधान! तुमचीही पर्स होऊ शकते लंपास

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಮೇ 30, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -